scorecardresearch

Youngest Billionaire : अवघ्या ९ वर्षाच्या मुलाकडे आहे बंगला, प्रायव्हेट जेट आणि सुपर कार्स; राहणीमान एखाद्या राजपुत्रापेक्षा कमी नाही

नायजेरियाच्या लागोसमध्ये राहणारा मोम्फा ज्युनिअर, अरबपती नायजेरियन इंटरनेट सेलिब्रिटी इस्माइलिया मुस्तफा, मोहम्मद अवल मुस्तफा यांचा मुलगा आहे.

momfa
९ वर्षाच्या मोम्फा ज्युनिअरला जगातील सर्वात कमी वयाचा अरबपती म्हटलं जातंय. (Photo : instagram/@momphajnr)

वयाच्या ९व्या वर्षात आपल्यापैकी अनेकांना कदाचित अरब म्हणजे नक्की किती हे देखील माहित नसेल. परंतु सर्वांचंच आयुष्य सारखं नसतं. नायजेरियामधील एक ९ वर्षाचा मुलगा ऐशो-आरामाचं जीवन जगत आहे. त्याला जगातील सर्वात कमी वयाचा अरबपती म्हटलं जातंय. मोहम्मद अवल मुस्तफा उर्फ मोम्फा ज्युनिअर अगदी कार्टूनमधल्या रिची रिचचं आयुष्य जगतोय. त्याच्याकडे वयाच्या सहाव्या वर्षीच स्वतःचा पहिला बंगला (Mansion) होता.

द सनच्या रिपोर्टनुसार मोम्फा एका खाजगी जेटमधून जगभर फिरतो. त्याच्याकडे इतर अनेक बंगले आणि सुपर कार्स आहेत. नायजेरियाच्या लागोसमध्ये राहणारा मोम्फा ज्युनिअर, अरबपती नायजेरियन इंटरनेट सेलिब्रिटी इस्माइलिया मुस्तफा, मोहम्मद अवल मुस्तफा यांचा मुलगा आहे. मोम्फा ज्युनिअर याचे त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ३० हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. इंस्टाग्रामवर तो आपल्या भव्य जीवनशैलीचे फोटो पोस्ट करतो. त्याला वर्साचे आणि गुची यांच्यासारख्या स्टायलिश ब्रँडचे कपडे परिधान केलेले आपण पाहू शकतो. तसेच त्याच्या अनेक फोटोमध्ये सुपर कार्स देखील पाहायला मिळतील.

ऐकावे ते नवलच… ५६ व्या वर्षी झाला स्पर्म डोनर; १० वर्षांमध्ये झाला १२९ मुलांचा बाप

एका फोटोमध्ये तो त्याच्या खाजगी जेटमध्ये जेवताना दिसत आहे. हा युवा अरबपती आपल्या लहान बहिणीसोबत आपल्या वडिलांच्या इंस्टाग्रामवर ददरोज दिसतो.

आपल्या महागड्या गाड्यांच्या संग्रहाचे प्रदर्शन करताना, मोम्फा ज्युनिअरच्या काही फोटोंच्या कॅप्शनमध्ये ‘हॅपी बर्थडे टू मी’ आणि ‘थँक्स डॅडी’ असे लिहले आहे. यांच्या सुपर कारच्या कलेक्शनमध्ये एक पिवळ्या रंगाची फरारी, बेंटले फ्लायिंग स्पार आणि रोल्स-रॉयस व्रेथ यांचा देखील समावेश आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, मोम्फा सिनिअर यांनी मोम्फा ज्युनिअरच्या सहाव्या वाढदिवशी त्याला त्याचा पहिला बंगला भेट म्हणून दिला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Youngest billionaire 9 year old boy owns bungalow private jet and super cars pvp

ताज्या बातम्या