Stream Accident Viral Video : मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे तरुण मंडळी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी नदी, ओढे, धबधब्याच्या ठिकाणी गर्दी करताना दिसतायत. पण याठिकाणी आनंद लुट असताना काही सेकंदात भयंकर अपघात होऊ शकतो, याचा कोणी विचारही करु शकत नाही. तरुणांच्या एका ग्रुपबरोबर अशीच काहीशी घटना घडली आहे, जी पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, या थरारक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय,.
मुसळधार पावसात वाहणाऱ्या ओढ्याच्या प्रवाहात मजा मारणाऱ्या एका तरुणाच्या अंगावर अचानक एक भलामोठा दगड कोसळला. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ पाहून नेटकरी घाबरलेत.
तोल जाऊन तरुण दगडासह खाली कोसळला अन्…
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, काही तरुण मुसळधार पावसात एका ओढ्यामध्ये उतरून भिजण्याचा आनंद घेत आहेत. सर्वजण हसत-खेळत मज्जा करत होते, याचवेळी एक तरुण ओढ्याच्या प्रवाहात दोन पाय रुंद करुन उभा राहिला, यावेळी त्याने समोरील एका दगडाला जोरदार धक्का दिला, या धक्क्यात दगड वेगाने खाली आला, या तोल जाऊन तो दगडासह खाली कोसळला. प्रवाहाने त्याला काही अंतरापर्यंत वाहून नेले. सुदैवाने तो फार दूर वाहून गेला नाही किंवा त्याचे हात-पाय दगडाखाली अडकले नाहीत, नाहीतर त्याला गंभीर दुखापत झाली असती, कदाचित जीवही गेला असता, पण सुदैवाने असे काही घडले नाही.
हा व्हायरल व्हिडिओ हेच दाखवतो की, केवळ प्रसिद्धीसाठी किंवा अतिउत्साहात असे जीवघेणे कृत्य करु नका. ओढ्यातील हा धक्कादायक व्हिडीओ @trigguuuu नावाच्या एक्स अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, यमराज आज सुट्टीवर होते वाटतं?, दुसऱ्याने लिहिले की, रिल्सने लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट केली आहे, प्रत्येक गोष्ट गंमतीसाठी नसते.
