Australian tourist harassed in Kolkata : भारत हा देश आपल्या अथांग आणि वैविध्यपूर्ण सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. भारतातील नैसर्गिक सौंदर्य, प्राचीन ऐतिहासिक वारसा आणि अद्वितीय सांस्कृतिक विविधता परदेशी पर्यटकांना नेहमीच मंत्रमुग्ध करत आली आहे. यासोबतच, येथील ‘अतिथी देवो भव’ ही आदरातिथ्याची भावना आणि अध्यात्मिक शांतता यामुळे जगभरातून पर्यटक येथे येतात. मात्र, याच भारताची मान शरमेने खाली नेणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

भररस्त्यात ऑस्ट्रेलियन पर्यटकाशी असभ्य वर्तन (Rude behavior with an Australian tourist on the street)

एका ऑस्ट्रेलियन पर्यटकाने स्वतः रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमुळे सध्या सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कोलकातामधील एका रस्त्यावरील या व्हिडिओमध्ये, एक तरुण परदेशी पर्यटकाकडे वारंवार चुंबनाची (Kiss) मागणी करताना आणि नकार दिल्यानंतरही त्याचा हात धरून ओढताना दिसत आहे. ‘मार्को रोम्स’ नावाच्या युझरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या क्लिपमध्ये, हा पर्यटक रस्त्यावरून चालत असताना रिक्षात बसलेला एक तरुण त्याच्याजवळ येतो आणि असभ्य वर्तन करू लागतो.

भारतीय तरुणाने ऑस्ट्रेलियन पर्यटकाकडे किस करण्याची केली मागणी (Indian man asks Australian tourist for a kiss)

सध्या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये तो तरुण, “इथे किस कर, किस कर,” असे म्हणत आपल्या गालाकडे सारखा हातवारे करताना दिसत आहे. या प्रकारामुळे स्पष्टपणे अस्वस्थ झालेला तो पर्यटक, “मी तुला किस करू? नाही, माफ कर, मी स्ट्रेट आहे,” असे उत्तर देऊन परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न करतो.

नकार देऊनही ऑस्ट्रेलियन पर्यटकाचा हात धरला (Australian tourist held his hand despite his refusal)

मात्र, मागे हटण्याऐवजी तो तरुण पर्यटकाला त्रास देत राहीला. शेवटी परदेशी पर्यटक तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो तरुण त्याचा हात पकडतो. या प्रसंगातून सुटका झाल्यावर तो पर्यटक कॅमेऱ्यासमोर म्हणाला, “व्वा! माझ्यापेक्षा लहान वयाच्या मुलांकडून माझा चक्क विनयभंग होतोय.” या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भारतीय मुलांना नेहमी तुम्हाला किस करावे असं का वाटतं?”

ऑस्ट्रेलियन पर्यटकाच्या व्हायरल व्हिडिओवरून सोशल मीडियावर दोन गट! (Two groups on social media over viral video of Australian tourist!)

परदेशी पर्यटकाशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणावर कारवाईची मागणी (Demand for action against youth who misbehaved with foreign tourist)

शेवटच्या अपडेटनुसार, या व्हिडिओला ८.५ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी त्या तरुणाच्या वागणुकीवर कडक शब्दांत टीका करत पर्यटकाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.एका युझरने म्हटले, “मला वाटतं तुम्ही चुकीच्या भारतात आला आहात,” तर दुसऱ्याने @kolkatapolice टॅग करत कृपया या मुलांना चांगला धडा शिकवा अशी कमेंट करत कारवाईची मागणी केली आहे.

भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न; ऑस्ट्रेलियन पर्यटकावर संतापले भारतीय

दुसरीकडे, काही युझर्सनी या पर्यटकालाच धारेवर धरले आहे. काहींनी प्रश्न विचारला की, बहुतेक भारतीय सहसा टाळतील अशा धोकादायक ठिकाणी तो(पर्यटक) का जात आहे. एका युझरने कमेंट केली, “भारतातील चांगल्या पर्यटन स्थळांना भेट देण्याऐवजी, तुम्ही लोक फक्त व्ह्यूज आणि कंटेंटसाठी मुद्दाम अशा धोकादायक किंवा झोपडपट्टी भागांमध्ये जाता आणि नंतर भारताची प्रतिमा मलीन करणारी कॅप्शन्स टाकून रील्स अपलोड करता.तर दुसऱ्याने म्हटले: “जर तुम्ही इतके कंगाल असाल की खऱ्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकत नाही, तर कंटेंटसाठी वाटेल त्या झोपडपट्ट्यांमध्ये भटकल्यानंतर भारताला दोष देऊ नका.”