Viral Video Shows Man Preparing Peacock Curry : लॉकडाउनपासून अनेकांनी छोटे छोटे व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. अगदी मोदक, इडली, नाश्त्याचे काही पदार्थ, तर फूड ट्रक किंवा पेस्ट्रीचे छोटेसे स्टॉल उघडून हे पदार्थ ते विकत असल्याचे दिसत आहे. त्यातही बरेच जण आवड म्हणून, तर काही जण प्रसिद्ध होण्यासाठी उगीच पदार्थांमध्ये विचित्र प्रकार टाकताना दिसतात. त्यामध्ये आइस्क्रीम किंवा गुलाबजामुनचा डोसा, मिरचीचे आइस्क्रीम, वडापावचा पिझ्झा असे काही विचित्र कॉम्बिनेशनचे पदार्थ बनवतात. अर्थात, ग्राहकांना हे पदार्थ बघायला आणि खायलाही आवडणार नाही. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने हद्दच पार केली आहे. त्याने चक्क मोराची करी बनवली आहे.

यूट्यूब आधारित या शेफची ओळख प्रणय कुमार, अशी आहे. प्रणय कुमारने पारंपरिक ‘मोराची करी’ ही अनोखी पाककृती ऑनलाइन तयार केली. ही रेसिपी बनविताना त्याने एक व्हिडीओसुद्धा अपलोड केला होता. त्यामध्ये त्याने ‘मोराची करी’ कशी बनवायची हेसुद्धा नमूद केलं आणि हा व्हिडीओ बघता बघता प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओ पाहून प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी (animal rights activists) हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर व्हिडीओही काढून टाकण्यात आला. नक्की काय शेअर करण्यात आलं होतं ते व्हायरल पोस्टमधील स्क्रीशॉटमध्ये बघा.

shop owner wrote Oh Stree Kal Phir Aana tagline and stree collection name on the shop board
“ओ स्त्री कल फिर आना” दुकानाच्या पाटीवर लिहिली टॅगलाईन, दुकान मालकाची मार्केटिंग स्टाइल पाहून व्हाल अवाक्
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Duleep Trophy 2024 Rishabh Pant joins Shubman Gill lead A team
ऋषभने आपल्या कृतीने जिंकली पुन्हा चाहत्यांची मनं, विरोधी संघाची रणनीती जाणून घेण्यासाठी केलं असं काही की…
Shocking video Caution For Momo Lovers! Vendor Spotted Kneading Momo Dough With Feet In Jabalpur
तुम्हीही रस्त्यावरचे मोमोज मोठ्या आवडीने खाता ना? विक्रेत्याचा ‘हा’ किळसवाणा VIDEO पाहून झोप उडेल
Leader of Opposition in Lok Sabha and Congress MP Rahul Gandhi and party General Secretary Priyanka Gandhi Vadra
Ujjain Rape News: उज्जैनमधील उघड्यावर बलात्कार प्रकरण मानवतेला कलंक; राहुल गांधी, प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप
Loksatta viva safarnama Map reading and traveling
सफरनामा: नकाशावाचन आणि भटकंती
Bhiwandi cosmetics marathi news
कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांची भिवंडीत विक्री
Animal fight video deer vs crocodile video
VIDEO: “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे”, हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

हेही वाचा…Swan Video: पाण्यात पिल्लांसह पोहण्यासाठी हंसाने बनवलं पंखांचं घर; चारही पिल्ले बसली पाठीवर अन्… पाहा सुंदर क्षण

पोस्ट नक्की बघा…

पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओला ‘पारंपरिक मोराची करी – असं नाव देऊन थंबनेल (Thumbnail)वर मोर पक्षी आणि मोरापासून बनवलेल्या करीचा एक फोटो ठेवला आहे. तसेच धक्कादायक गोष्ट म्हणजे एका व्हिडीओत मोराच्या करीसाठी मोर कसा कापला, करी बनवण्यासाठी फोडणी कशी दिली हेसुद्धा व्हिडीओद्वारे शूट करण्यात आले आहे. बनविणारी व्यक्ती ही करी खातानासुद्धा दिसत आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा वन अधिकाऱ्यांना समजल्या, तेव्हा एक पथक तांगल्लापल्ली गावात पोहोचले आणि त्यांनी त्या व्यक्तीच्या घरातून चिकन करी जप्त केली.

ही घटना तेलंगणामध्ये घडली आहे आणि हा व्हिडीओ @munsifdigital या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये घडलेली घटना थोडक्यात नमूद करण्यात आली आहे. वनाधिकाऱ्यांनी व्यक्तीने बनविलेल्या करीचा नमुना फॉरेन्सिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणाविरोधात रविवारी त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हादेखील दाखल करण्यात आला. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हा व्हिडीओसुद्धा यूट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे.