एक युट्युबर महिंद्रा बोलेरो विकत घेण्यासाठी आपल्या मित्रांसह महिंद्राच्या शोरूममध्ये पोहचला. आता तुम्ही म्हणाल, यात काय नवीन. पण या पठ्ठ्याने नाण्यांमध्ये पैसे देऊन नवीन महिंद्रा बोलेरो वाहन खरेदी केले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी एका भाजी विक्रेत्याने आपल्याकडे नाण्यांच्या रूपात साठवलेले पैसे देऊन स्कुटर खरेदी केले होते. पैसे शोरूमपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्याने एका गोणीची मदत घेतली होती.

महिंद्रा बोलेरो या गाडीची किंमत जवळपास १२ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती गाडी खरेदी करण्यासाठी १२ लाख रुपयांची चिल्लर शोरूममध्ये घेऊन आला. युट्युबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये, मित्रांचा एक ग्रुप महिंद्रा शोरूममध्ये प्रवेश करताना आणि बोलेरोच्या किमतींबद्दल विचारपूस करताना दिसत आहे. शोरूममध्ये प्रवेश करताच या व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या बोलेरोच्या किमतीची चौकशी केली आणि मग त्याचे मित्र अनेक पोत्यांसह तिथे पोहोचले.

Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
complainant get back rs 3 5 lakh duped by online fraud with the help of kashimira police
वसई: ऑनलाईन फसवणुकीतील सव्वा तीन लाख रुपये मिळवून दिले, काशिमिरा पोलिसांनी तत्पर कारवाई
Agra Woman Plans Husband Murder
पतीला ठार करण्यासाठी पत्नीने दिली ऑनलाईन ‘सुपारी’, What’s App वर ठेवलं ‘हे’ स्टेटस

Viral Video: पोलीस दिसताच दंड टाळण्यासाठी तरुणीने वाढवला स्कुटीचा वेग; त्यानंतर जे झालं ते पाहून हैराण व्हाल

पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

नाण्यांद्वारे पैसे देण्याची परवानगी मिळताच कर्मचारी शोरूमच्या टेबलावर आणि मजल्यांवर पैसे मोजयला बसले. पेमेंट झाल्यानंतर त्यांनी कागदपत्र पूर्ण करून चाव्या गाडीच्या नवीन मालकांना दिल्या. तथापि, व्हिडीओमध्ये हे स्पष्ट झाले नाही की युट्युबरने वाहन खरेदी करण्यासाठी संपूर्ण १२ लाख रुपयांची नाणी दिली की फक्त काही भाग दिला.

कमेंट बॉक्समध्ये युजर्स असा अंदाजही लावत आहेत की फक्त हा व्हिडीओ शूट करण्यासाठी हे सर्व करण्यात आला आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ फेक असल्याचेही म्हटले आहे. यात तथ्य नाही. एका यूजरने लिहिले की, ‘नाटक छान साकारले आहे. तुम्ही वाहन आधीच खरेदी केले असं वाटतंय, कारण व्हिडीओ नाटकासारखा दिसत आहे.’