कित्येक वेळा लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याच्या नादात काही जण असं काही करून जातात की त्यांना आपण काय करतोय याचं देखील भान उरत नाही. एका सुप्रसिद्ध युट्यूबरने एका नऊ वर्षाच्या मुलासोबत असं काही केलं की सोशल मीडियावरील युजर्सनी शाळा घेण्यास सुरूवात केली. हे प्रकरण इतकं वाढलं की या महिला युट्यूबरला तिचं युट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट करावं लागलं. या प्रकरणाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरूय. पहा नेमकं काय आहे हे प्रकरण ?

अमेरिकेतील ३० वर्षीय जॉर्डन चेयेन हिच्या युट्यूब चॅनलचे मोठ्या प्रमाणात सबस्क्राइबर्स आहेत. सध्या जॉर्डनचा तिच्या लहान मुलासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ती आपल्या मुलीला कॅमेऱ्यासमोर रडण्यासाठी जबरदस्ती करताना दिसून येतेय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी तिला खडेबोल सुनावले.

आणखी वाचा : दूरदर्शनचा आज ६२ वा वाढदिवस; ट्विटरवर झळकल्या अविस्मरणीय आठवणी

मिरर यूके या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, जॉर्डन चेयेन हिने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. यात ती आणि तिचा लहान मुलगा दिसून येत होता. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “आम्ही खूप दुखावलो आहोत.” खरं तर हा व्हिडीओ चेयेनचा कुत्रा आजारी पडल्याबाबत होता. या व्हिडीओमध्ये चेयेनने तिच्या मुलाला कॅमेऱ्यासमोर रडण्यासाठी भाग पाडलं. तिच्या युट्यूब चॅनलला जास्त लाईक्स आणि व्हूयज मिळावेत म्हणून तिने या व्हिडीओमध्ये मुलाला रडण्यासाठी भाग पाडलं.

या व्हिडीओमध्ये ते एका कारमध्ये बसलेले दिसत आहेत. ती महिला युट्यूबर आपल्या मुलाला आपल्याकडे खेचताना दिसते. या दरम्यान, ती तिच्या मुलाला त्याच्या खांद्यावर डोके ठेवण्यास आणि रडण्यासाठीचा अभिनय करण्यास भाग पाडताना दिसतेय. या महिला युट्यूबरने हा व्हिडीओ डिलीट केला जरी असला तरी हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओच्या अनेक क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा : ताऱ्यांचे बेट… नासाने शेअर केलेले हे फोटो पाहून Speechless व्हाल

त्यानंतर सोशल मीडियावरील युजर्सनी या महिला युट्यूबरला चांगलंच सुनावलं. हे प्रकरण इतकं वाढलं की अक्षरशः या महिलेवर तिचं युट्यूब चॅनल आणि सोबतच तिचं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट करण्याची वेळ आली.