व्हिडिओसाठी स्टंटमनचा लंडनच्या गगनचुंबी इमारतीवर स्टंट

सारे काही युट्युब चॅनेलसाठी

लंडनमधल्या कॅनरी वोर्फ या ५० मजल्याच्या इमारतीच्या छतावर चढून स्टंट करण्याचा प्रयत्न दोन स्टंटमनने केला.

गेल्या आठवड्यात रशियातील मॉडेल व्हिक्टोरिआ ओदिनोत्स्वा हिचा एक व्हिडिओ व्हायरल झालो होता. दुबईतल्या सगळ्यात उंच इमारतीवर तिने आपला जीव धोक्यात घालून फोटोशूट केले होते. जगातल्या उंचच उंच इमारतींवर चढून स्टंट करणारी ती काही पहिली नाही असे अनेक युट्युबर असतील जे केवळ प्रसिद्धीसाठी असे स्टंट करतात. त्यांना फॉलो करणारा वर्ग मोठा आहे. या ‘खतरो के खिलाडीं’वर वारंवार टीकाही होतात. पण असे असताना जीव धोक्यात घालून स्टंट करण्याचा त्यांचा नाद काही जात नाही. मॉडेल व्हिक्टोरिआ ओदिनोत्स्वाचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका स्टंटमनने लंडनमधल्या उंच इमारतीवर जाऊन स्टंट करण्याचा प्रयत्न केला.

वाचा : …तिचा गगनचुंबी थरार!

Viral video : ‘डेअरडेव्हील’ ओलेगची काळजाचा ठोका चुकवणारी स्टंटबाजी

लंडनमधल्या कॅनरी वोर्फ या ५० मजल्याच्या इमारतीच्या छतावर चढून स्टंट करण्याचा प्रयत्न दोन स्टंटमनने केला. या इमारतीच्या छतावर चढून यातल्या एका स्टंटमनने लटकण्याचा प्रयत्न केला. जवळपास अशक्य असे स्टंट हे दोघेही करत होते. मरणाची भिती दूर दूरपर्यंत यांच्या चेह-यावर नव्हती. दहा मिनिटाचा हा व्हिडिओ युट्युबवर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक वेगळच प्रकरण बाहेर येत आहे. या इमारतीत युरोपातल्या अनेक महत्त्वाच्या बँकेची मुख्यालये आहेत. असे असताना सुरक्षारक्षकांना चकवा देत हे दोघेही वर पोहोचले कसे असा प्रश्न विचारला जात आहे. दुर्दैव म्हणजे ही सुरक्षा इतकी ढिसाळ होती की या महत्त्वाच्या इमारतीचे छतही खुले होते.
काही दिवसांपूर्वी दुबईतही असाच प्रकार घडला होता. युट्युबवरचा प्रसिद्ध स्टंटमन ओलेग यानेही इमारतीच्या टेरेसवर स्टंट केले होते. आता या प्रकरणाची चौकशीही सुरू आहे जर या प्रकरणात तो दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Youtubers climb on skyscraper in london just for video