Yuvraj Singh Airbnb In Goa: क्रिकेटमधून निवृत्ती घेत अनेक खेळाडू आता व्यवसायातही पदार्पण करत आहेत, विराट कोहलीचे हॉटेल चर्चेत असताना आता माजी क्रिकेटर युवराज सिंगने गोव्यामध्ये एअरबीएनबी विकत घेऊन आपल्या नव्या खेळीला सुरुवात केली आहे. गोव्यातील कासा सिंग येथील त्याचे घर एअरबीएनबीमध्ये नोंदवलेले असून आता तुम्हीही तुमच्या पुढच्या गोवा प्लॅन मध्ये युवराजचे पाहुणे बनू शकता. युवराजचा हा तीन बेडरूमचा आशियाना एका टेकडीवर वसलेला असून इथून समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

एअरबीएनबी होस्ट बनणारा युवराज हा भारतातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. याबाबत माहिती देताना “माझे गोव्यातील घर माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. माझे काम मला जगभर घेऊन जात असताना, हा व्हिला असा आहे जिथे माझी पत्नी आणि मी आमच्या मित्र आणि कुटुंबासोबत सुंदर वेळ घालवण्यासाठी एकत्र आलो. मी एअरबीएनबी होस्ट बनून सहा जणांच्या भाग्यवान गटासाठी माझ्या घराचे दरवाजे उघडण्यास उत्सुक आहे.” असे कॅप्शन लिहून युवराजने इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

Viral video JCB worker made little boys day remember
“कोणाच्या तरी हसण्याचे कारण बना” खोदकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चिमुकल्याच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू; VIDEO एकदा पाहाच
LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
Hardik Emotional After Third Defeat
MI vs RR : ‘आम्ही लढत राहू आणि पुढे…’, सलग तिसऱ्या पराभवानंतर हार्दिक पंड्याची भावनिक पोस्ट व्हायरल
women Forcefully married with travels businessman and stolen 17 lakhs
‘लुटेरी दुल्हन!’ ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याशी बळजबरी लग्न, १७ लाख उकळले

युवराजच्या पाहुण्यांना सवलत मिळणार

एअरबीएनबीच्या अधिकृत वेबसाइटवर घर बुक केले जाऊ शकते. हे घर १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान दोन रात्रीच्या मुक्कामासाठी १,२१२ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. योगायोगाने, १२ ही युवराजची जन्मतारीख (१२ डिसेंबर) आणि जर्सी क्रमांक आहे. कासा सिंगमध्ये विस्तृत डेक आणि टेरेस आहेत. तीन बेडरूमच्या व्हिलामध्ये एक आलिशान पूल आहे ज्यामध्ये स्विम अप बार आहे. पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी युवराजचे वैयक्तिक शेफही उपस्थित असतील. चेक इन केल्यानंतर तुम्ही युवराजला ऑनलाईन भेटू शकाल. कासा सिंगसाठी बुकींग २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सुरू होईल

युवराज सिंग इंस्टाग्राम

एअरबीएनबीचे महाव्यवस्थापक अमनप्रीत बजाज यांनी याविषयी प्रतिक्रिया देत “युवराज सिंगसह भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. गोव्यातील त्याचे सुंदर घर Airbnb वर या एकाच वेळेच्या मुक्कामासाठी उपलब्ध असेल. जागतिक पर्यटकांना हा अविस्मरणीय अनुभव ठरेल” असे म्हंटले आहे.

दरम्यान, यापूर्वी युवराज सिंगप्रमाणेच सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान, अभिनेत्री सोनम कपूर, लेखिका ट्विंकल खन्ना, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि बॉलिवूड दिग्दर्शक फराह खान कुंदर यांनीही आपले स्वप्नवत बंगले एअरबीएनबी सह उपलब्ध केले आहेत.