Crocodile attack video: मगर ही पाण्यातील सर्वात शक्तीशाली प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती पाण्याखाली दबा धरून बसते आणि संधी मिळताच हल्ला करते. परंतु तिचा हल्ला इतका जोरदार असतो की ती एका झटक्यात समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करते. त्यामुळेच काही जण मगरीला पाण्यातील राक्षस असं देखील म्हणतात. पण याच मगरीला चक्क एका झेब्य्राने धडा शिकवला.सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका मगर आणि झेब्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मगरीने झेब्रावर केलेल्या हल्ल्याचा हा व्हिडीओ आहे. मगरीने झेब्रावर हल्ला केला, पण झेब्राने मोठ्या प्रयत्नांनी स्वत:ची मगरीच्या तावडीतून सुटका करून घेतली. ट्वीटरवर हा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नदीमध्ये एक मगर शिकारीच्या शोधात आहे. त्याचवेळी नदीतून झेब्रा जात असते. तेवढ्यात एक मगर संधी साधून झेब्य्रावर हल्ला करते. या झेब्य्राचा पाय पकडून त्याला पाण्यामध्ये खेचू लागते. पण बहुदा झेब्रा देखील या हल्ल्यासाठी तयार होता. परिणामी त्याने मगरीवर जोरदार पलटवार केला. झेब्रा संपूर्ण ताकदीने या मगरीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतो. झेब्रा काही काळ शांत उभा राहिला. अचानक त्याने पलटी मारली आणि अनपेक्षितपणे मगरीच्या तावडीतून सुटला. हा व्हिडीओ पाहून तुम्ही दंगच व्हाल. झेब्रा हा तसा शांत प्राणी आहे. पण जीवावर बेतल्यावर तो देखील किती घातक होऊ शकतो हे तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता.

विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Giant python shocking video
शिकारीसाठी महाकाय अजगर कालव्यात शिरला अन् झाला गेम; पाण्यात गुदरमला अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL
Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
video shows Monkey And Man ate from one plate
VIDEO : विश्वासच बसेना! जेवताना ताटापुढे येऊन बसले माकड अन्… पुढे जे घडले, ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
woman fed a thirsty monkey water
आधी बॅगेवर, मग बाकावर! पाण्याच्या थेंबासाठी सैरभैर झालेल्या माकडाला ‘तिने’ ओळखले; VIDEO पाहून म्हणाल माणुसकी आहे जिवंत
Jungle Viral Video
‘भूक जगूही देत नाही आणि मरूही देत नाही…’ दोन प्राण्यांमध्ये एका घासावरून भांडण; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘नात्यात स्वार्थ जिंकतो’

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे आता तर हद्दच पार केली! चोर आला महिलांचे वाळत घातलेले अंतर्वस्त्र घेतले अन्…VIDEO पाहून येईल संताप

या व्हिडीओला १५ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज गेले असून युजरने “त्या झेब्राने मगरीला चावले,” असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे. हा व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केल्यापासून खूप व्हायरल झाला आहे आणि त्याला सर्वाधिक अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी झेब्राच्या धैर्याचे खूप कौतुक केले आहे. या घटनेने हे सिद्ध केले आहे की कधीही हार मानू नये. तर एकानं प्रतिक्रिया देत म्हंटलंय, “नशीब नाही प्रयत्नांचा खेळ”

दुसऱ्या युजरने कमेंट केली, “तो झेब्रा बचावला! म्हणूनच कधीही हार मानू नये.” तर आणखी एकानं लिहिले, “जगण्याची इच्छा प्रत्येक सजीवात असते.” आणखी एकाने म्हटले, “शेवटी तो बचावला याचा खूप आनंद झाला.

Story img Loader