शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि सर्वात सुंदर काळ असतो. शाळेतील दिवस आठवले तरी चेहऱ्यावर नकळत एक हसू येतं. गणित-विज्ञानाचा तास बुडवण्यापासून ते स्नेहस्नमेलनात नाचण्यापर्यंत शाळेच्या लाखो आठवणी झरकन डोळ्यासमोरून जातात. शाळेतील स्नेहसमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस कारण त्या दिवशी अभ्यास नसतो, कोणत्याही शिक्षकांचा तास नसतो तर फक्त आणि फक्त मज्जा असते. अनेक उत्साही विद्यार्थी डान्स करतात, नाटक सादर करतात सर्वांचे कौतुकही मिळवतात. अशा काही विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना त्यांच्या शाळेतील दिवस आठवले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये काही विद्यार्थी आणि शिक्षक स्नेहसमेलनात दरम्यान डान्स करत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थी अफलातून डान्स करतच आहे पण सर्वांचे लक्ष वेधले ते विद्यार्थ्यांबरोबर तेवढ्याच उत्साहत नाचणाऱ्या शिक्षकाने वेधले आहे. विद्यार्थ्यांच्या बरोबरीने उत्साह आणि उर्जा असलेले शिक्षक आपल्या जबरदस्त नृत्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. एका अहिराणी गाण्यावर शिक्षक आणि विद्यार्थी नाचत आहे. गाण्याच्या प्रत्येक तालावर सर्वजण अचूक ठेका घेत आहे. डान्स स्टेपही अचूकतेने करत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल व्हिडीओ छ. संभाजीनगरमधील असून निंभोरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील स्नेहसंमेलनाचा आहे. इंस्टाग्रामवर anil_sheware1501k या खात्यावरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सखू तुना कपाळ ले लाल लाल कुकू या अहिराणी गाण्यावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अफलातून डान्स केला असून नेटकऱ्यांना तो प्रचंड आवडला आहे.
व्हिडीओ पाहून अनेकांना शिक्षकांच्या उत्साहाचे कौतुक केले तर काहींनी मराठी शाळेचे कौतुक केले. एकाने कमेंट केली की,”दादा ही मराठी शाळा आहे इथे विषय टॉपचाच होणार!”
दुसऱ्याने कमेंट केली की,”आयुष्यामध्ये आनंद पण घेतला पाहिजे घेत असताना आनंद दिला पण आला पाहिजे”
तिसऱ्याने कमेंट केली की, हे फक्त जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षकच करू शकतात.
चौथ्याने कमेंट केली की,”हे शिक्षक आणि विध्यार्थी यांच्या मधलं प्रेम फक्त मराठी शाळेतच पाहायला मिळत बाकी इंग्रजी माध्यमातून फक्त एक व्यापार बघायला मिळतो. फी भरली नसेल तर स्वतः शिक्षकच वर्गात बसू देत नाही आणि मराठी शाळेत पोरं कसे वर्गात बसतील या वर लक्ष दिल जात.”
पाचव्याने कमेट की, विषय टॉपचा गुरूजी
सहाव्याने कमेंट केली की, जिल्हा परिषद म्हणजे टॉपचा विषय
शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्याचे आयुष्य घडवतात. शालेय जीवनात विद्यार्थी ओल्या मातीसारखे असतात. त्यांना घडवण्याचे, आकार देण्याचे काम शिक्षक करतात. विद्यार्थ्यांमधील कला गुणांना ते वाव देतात मग तो अभ्यासाबाबत असो किंवा नाच, गाणे, कला, कविता, क्रिडा किंवा इतर काही असो. शिक्षिकांच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. व्हायरल व्हिडीओमध्ये देखील शिक्षकांबरोबर नाचताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास दिसतो आहे.
