बांगलादेशविरुद्धचा एकमेव कसोटी सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर झिम्बाब्वेचा एकदिवसीय मालिकेमधील पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे. या सामन्यामध्ये बांगलादेशला विजय मिळवून देण्यामध्ये संघाचा सलामीवर लिटन दासची खेळी महत्वपूर्ण ठरली. दासने शानदार शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला. दासने ११४ चेंडूंमध्ये आठ चौकारांच्या मदतीने १०२ धावांची खेळी केली. त्यामुळे बांगलादेशच्या संघाने ५० षटकांमध्ये नऊ गड्यांच्या मोबदल्यात २७६ धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा सर्व संघ २८.५ षटकांमध्ये १२१ धावांवर बाद झाला. या सामन्यानंतर दासच्या शतकाचं कौतुक होत असलं तरी त्याचबरोबर झिम्बाब्वेचा गोलंदाज रिचर्ड नगारवाने केलेलं एक अनोखं सेलिब्रेशनही सोशल नेटवर्किंगवर चांगलच चर्चेत आहे.

झालं असं की नगारवाने बांगलादेशचा फलंदाज मोसदेक हुसैनला बाद केल्यानंतर हे अनोखं सेलिब्रेशन केलं. विकेट घेतल्यानंतर नगारवाने आपल्या पायातील एक बूट काढला आणि तो मोबाइल असल्याप्रमाणे कानाला लावून त्यावर बोलण्याचा अभिनय करु लागला. त्याने बूट काढला, त्यावर नंबर डायल करायचा अभिनय केला आणि तो बूट कानाला लावला. सोशल नेटवर्किंगवर सध्या नगारवाचं हे जगावेगळं सेलिब्रेशन फार व्हायरल झालं आहे. नगरवाने आपल्या १० षटकांमध्ये ६१ धावा देत दोन मुख्य फलंदाजांना बाद केलं. विशेष म्हणजे मोसदेकसोबतच नगरवाने शानदार शतक झळकावणाऱ्या दासलाही तंबूत पाठवलं. नगारवाने यापूर्वीही अनेकदा अशापद्धतीने विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा केलाय.

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

एप्रिलमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याने असं सेलिब्रेशन केलं होतं.

या सामन्यामध्ये दाससोबतच अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसननेही सुंदर गोलंदाजी केली. शाकिबने अवघ्या ३० धावांच्या मोबदल्यात झिम्बाब्वेचा अर्धा संघ बाद केला. या विजयासोबतच बांगलादेशने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये १-० ने आघाडी मिळवील आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रॅडन टेलरचा हा २०० वा एकदिवसीय सामना होता. मात्र या सामन्यात झिम्बाब्वेला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यामध्ये १२१ धावांपैकी ५४ धावा तर झिम्बाब्वेचा विकेटकिपर रेजिस चकाब्वाने केल्या होत्या. झिम्बाब्वेच्या संघाने आपल्या शेवटच्या पाच विकेट्स तर अवघ्या १६ रनांच्याम मोबदल्यात गमावल्या. या सामन्यामध्ये शानदार शतक ठोकणाऱ्या दासला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.