Zomato डिलिव्हरी बॉयचा VIDEO VIRAL; माउथ ऑरगनने गाणं वाजवून झाला देशभरात फेमस!

तुम्हाला जर जुनी गाणी ऐकायची सवय किंवा आवड असेल तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुमचं मन नक्कीच जिंकेल.

Zomato-Food-Delivery-Boy-Viral
(Photo: .linkedin/ Sumanto Bhattacharya)

तुम्हाला जर जुनी गाणी ऐकायची सवय किंवा आवड असेल तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुमचं मन नक्कीच जिंकेल. एका व्यक्तीनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्यक्तीने झोमॅटोवरून फुड डिलिव्हरी मागवली, पण जेवणासोबतच त्याला त्याहूनही बेस्ट सर्व्हिस मिळाली. घरी ऑर्डर घेऊन आलेल्या या फुड डिलिव्हरी बॉयने त्याच्यासाठी ६० आणि ७० च्या दशकातील हिंदी चित्रपटांतील गाणे सादर केली आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमचं मन प्रसन्न होईल, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर झोमॅटो फुड डिलिव्हरी पार्टनरचा हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरलाय. सुमंतो भट्टाचार्य नावाच्या एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी लिंक्डइनवर या झोमॅटो फुड डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आणि हा झोमॅटो फुड डिलिव्हरी बॉयचा रातोरात स्टार बनलाय. सुमंतो भट्टाचार्य यांनी झोमॅटोवर जेवण ऑर्डर केलं होतं. याची डिलिव्हरी करण्यासाठी हा डिलिव्हरी बॉय आला तेव्हा सुमंतो यांनी सहज म्हणून त्या डिलिव्हरी बॉयचं प्रोफाइल चेक करताना त्या मुलाला गाण्याची आवड असल्याचं कळलं. हा मुलगा जेव्हा घरी ऑर्डर घेऊन आला त्यावेळी सुमंतो आणि त्याच्या पत्नीने या मुलाकडे एक अशी विनंती ज्याला तो नकार नाही देऊ शकला. “तो त्याच्या माउथ ऑर्गनवर काहीतरी वाजवू शकतो का?” असं सुमंतो यांनी या डिलिव्हरी बॉयला विचारलं. त्यावर हसत हसत या डिलिव्हरी बॉयने होकार सुद्धा दिला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सापाचे लागोपाठ वार आणि उंदराची अगदी ‘ब्रूस ली’ सारखी फाईट, पाहा कोणी मारली बाजी…

यावेळी या डिलिव्हरी बॉयने ६० आणि ७० च्या दशकातील अनेक गाजलेली गाणी माउथ ऑरगनने वाजवून दाखवली. या व्हायरल व्हिडीओमधल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचं नाव रोहीत असं आहे. ‘एक प्यार का नगमा है”, “बडे अच्छे लगते हैं” आणि “है अपना दिल तो आवरा” अशी एकापेक्षा एक रोमॅण्टिंक गाणी वाजवून या डिलिव्हरी बॉयने सुमंतो भट्टाचार्य आणि त्यांच्या पत्नीसाठी एक सुखद धक्का दिला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : मुलीसमोर मोठ्या फुशारक्या मारत होते तरूण, मग खिशातून नाणं पडलं आणि…

हा डिलिव्हरी बॉय जेव्हा माउथ ऑरगनने गाणे वाजवत होता तेव्हा त्याच्या ओठांवरून हसू फुलत होते,” असं लिहीत भट्टाचार्य यांनी त्याचा हा व्हिडीओ शेअर केला. जेव्हा सुमंतो यांनी त्याच्या या अनोख्य सर्व्हिसबाबत त्याचे आभार मानले त्यावेळी त्याने स्माईल देत उत्तर देताना म्हटलं की, ‘मी माझ्या ग्राहकांना खूश करण्यासाठी मी माउथ ऑरगन वाजवतो.”

रोहितच्या या आश्चर्यकारक कामगिरीने इतर लिंक्डइन युडर्सनाही आश्चर्याचा धक्का दिलाय. संध्या भिडे नावाच्या युजरने सांगितले की, “रोहितने उपजीविका करत असताना त्याची आवड व्यक्त करण्याची संधी निर्माण केली. “सुख जीवनाचं एक उत्कृष्ट उदाहरण.” असं आणखी एका दुसऱ्या युजरने लिहिलंय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘त्या’ एअर होस्टेसवरही चढला ‘पुष्पा’ फिवर, ‘सामी सामी’ गाण्यावर केला रश्मिकापेक्षाही भन्नाट डान्स

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘Kacha Badam’ गाण्याची क्रेझ थेट टांझानियापर्यंत पोहोचली…, ‘त्या’ तरूणाचा डान्स होतोय VIRAL

डिलिव्हरी बॉय रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता झोमॅटो कंपनीने सुद्धा पुढाकार घेत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. “आम्ही अशा प्रतिभावान डिलिव्हरी सुपरहिरोंसोबत काम करण्यास आनंदी आहोत, आमच्या डिलिव्हरी फ्लीटचा आम्हाला दररोज अभिमानास्पद वाटतो,” असं देखील कंपनीने म्हटले आहे. “शक्य असल्यास, तुम्ही तुमच्या ऑर्डरचे डिटेल्स आमच्यासोबत शेअर करू शकाल का जेणेकरून आम्ही तुमचे कौतुक डिलिव्हरी पार्टनर पर्यंत पोहोचू शकू?” असं देखील कंपनीने सुमंतो यांच्यावर पोस्टवर विचारलं आहे.

हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक करत डिलिव्हरी बॉय रोहितच्या टॅलेंटचं कौतुक केलंय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. या व्हिडीओवरील कमेंट्स देखील वाचण्यासारख्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zomato agent plays hindi melodies for customer viral video wins hearts prp

Next Story
Video: टीव्ही चोरण्यासाठी आलेल्या तीन चोरांची फजिती; शेवटी झालं असं की तुम्हाला हसू आवरणार नाही
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी