Zomato Removes Negative Review: सध्या सर्वत्र ऑनलाइन फूड मागवण्याची पद्धत सुरू आहे. आपल्यापैकी अनेकजण झोमॅटो वरून ऑनलाइन फूड मागवत असतील. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर ही बातमी नक्की वाचा. आजकाल झोमॅटोला गंभीर प्रतिक्रियेचा सामना करावा लागत आहे कारण बेंगळुरू येथील एका ग्राहकाचा रिव्ह्यू कंपनीकडून हटवण्यात आला आहे. दिशा सांघवीने ट्विटरवर दावा केला की, कोरमंगला येथील रेस्टॉरंटमधील अन्न खाल्ल्यानंतर तिला अन्नातून गंभीर विषबाधा झाली. त्यानंतर तिने नंतर रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबद्दल एक रिव्ह्यू लिहिला. तिचा अनुभव शेअर करताना तिने हे देखील सांगितले की हे अन्न खाल्ल्यानंतर आरोग्याच्या समस्येचा सामना करणारी ती एकमेव व्यक्ती नव्हती.

अन्न खाऊन आजारी पडण्यानंतर लिहिला रिव्ह्यू

रिव्ह्यू लिहिताना, दिशाच्या लक्षात आले की इतर अनेक लोकांनी देखील अन्नाबद्दल तक्रार केली होती आणि त्यांना गेल्या काही महिन्यांत असाच अनुभव आला होता. मात्र कंपनीने तिचा रिव्ह्यू हटविल्यानंतर तिला प्राप्त झालेल्या ईमेलचा स्क्रीनशॉट तिने शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Zomato ने याचा हवाला देत रिव्ह्यू काढून टाकला आहे.’ दिशाने असेही लिहिले की, ‘अलीकडेच कोरमंगला येथील एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, जिथे माझे सहकारी आणि मला अन्नातून विषबाधा झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले होते. मी झोमॅटोवर याबाबत रिव्ह्यू लिहिला आणि यावेळी असे आढळले की गेल्या काही महिन्यांत बर्‍याच लोकांना असाच अनुभव आला आहे. मात्र झोमॅटोने याचा हवाला देत रिव्ह्यू काढून टाकला आहे.

Fire at Phoenix Mall on Nagar Street pune
पुणे : नगर रस्त्यावर फिनिक्स मॉलमध्ये आग
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?

( हे ही वाचा: दीदीची स्कुटी एन्ट्री एकदम जोमात! पार्क केलेल्या भल्यामोठ्या ट्रकमध्ये गाडी घेऊन अशी काही घुसली की.. पाहा Viral Video)

( हे ही वाचा: माणसाने चिप्स देण्यास नकार देताच माकडाला आला भयंकर राग; डोक्यावर उडी मारत केलेला हल्ला होतोय प्रचंड Viral)

( हे ही वाचा: अस्वलाच्या क्रोधापुढे वाघाची झाली पळताभुई; जंगलातील थरारक लढाईचा ‘हा’ Viral Video एकदा पहाच)

Zomato ने रिव्ह्यू काढताच एकच गोंधळ उडाला

दिशा सांघवीला पाठवलेल्या ईमेलमध्ये झोमॅटोने दावा केला आहे की हेल्थ कोडच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही. कंपनीने लिहिले, ‘झोमॅटोवर, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केलेले रिव्ह्यू नियमितपणे तपासतो आणि या तपासणीमध्ये आम्हाला आढळले आहे की हा रिव्ह्यू आमच्या सामग्री मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत आहे. अशा प्रकारे, आरोग्य संहितेच्या उल्लंघनाचा उल्लेख केल्याच्या आधारावर, ते काढून टाकण्यात येत आहे.’ दिशाने या इमेलचा स्क्रीनशॉटसोबत पोस्ट शेअर केली आणि काही तासांतच हे ट्विट व्हायरल झाले. यामुळे झोमॅटोलाही याला उत्तर द्यावे लागले. कंपनीने ट्विटला उत्तर दिले, ‘हाय, याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. कृपया खाजगी संदेशाद्वारे तुमचा फोन नंबर/ऑर्डर आयडी शेअर करा आणि आम्ही या प्रकरणात त्वरित लक्ष घालू.