फूड डिलिव्हरी अ‍ॅप झोमॅटो हे आपल्या अनोख्या जाहिरातींसाठी ओळखले जाते. पण, सध्या झोमॅटो कंपनी एका जाहिरातीमुळे अडचणीत आली आहे. झोमॅटोने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘लगान’ चित्रपटातील ‘कचरा’ या पात्राशी संबंधित एक जाहिरात केली होती. झोमॅटोच्या या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर नव्या वादाला सुरुवात झाली होती. जाहिरातीला होणारा विरोध पाहता कंपनीने आता ती मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लगान’ मधील ‘कचरा’ पात्राशी संबंधित जाहिरात –

झोमॅटोने मागे घेतलेल्या जाहिरातीमध्ये अभिनेता आदित्य लखिया याला ‘कचरा’ म्हणून दाखवण्यात आलं होतं. आदित्य लखिया याला लगान चित्रपटात एका दलित व्यक्तीच्या म्हणजेच ‘कचरा’च्या भूमिकेत दाखवलं होतं. त्यामुळे या जाहिरातीला जातीयवादी असल्याचा दावा करत, अनेकांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विरोध करायला सुरुवात केली. तसंच सोशल मीडियावर ‘बॉयकॉट झोमॅटो’ मोहीमदेखील सुरू करण्यात आली होती.

नेमकं काय आहे प्रकरण ?

हेही पाहा – शिक्षकांपुढे ChatGPT ही फेल! ७ वीच्या विद्यार्थ्याने AI चा वापर करुन गृहपाठ केला पण ‘त्या’ एका चुकीमुळे शिक्षकांना सापडला

ही होती वादग्रस्त जाहिरात –

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झोमॅटोने ‘लगान’ चित्रपटातील अभिनेता लखिया याला जाहिरातीमध्ये ‘कचरा’ म्हणून दाखवलं होतं. या जाहिरातीमध्ये लखियाला टाकाऊ टॉवेल, भांडी, टेबल आणि लॅम्पच्या रूपात दाखवण्यात आलं होतं. ही जाहिरात पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फूटलं होतं. तसंच बायकॉट झोमॅटो मोहीमदेखील सुरु करण्यात आली होती. जाहिरातीला होणारा विरोध पाहता झोमॅटोने माफी मागितली आणि जाहिरात काढून टाकल्याचं जाहीर केलं. या जाहिरातीमध्ये झोमॅटोने कचऱ्याचा पुनर्वापर कसा केला जाऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

दिलीप मंडल यांनी दिला होता इशारा –

झोमॅटोची जाहिरात रिट्विट करत दिलीप मंडल यांनी लिहिले होती की, तुमची जाहिरात अत्यंत जातीयवादी आणि अपमानास्पद आहे. माफी मागा आणि ती जाहिरात मागे घ्या. अन्यथा तुमच्यावर शेकडो खटले दाखल होतील. आशुतोष गोवारीकर यांनी पहिली चूक केली की त्यांनी दलित पात्राला कचरा असे नाव दिले. आता तुम्ही जखमेवर मीठ चोळत आहात. दरम्यान झोमॅटोने जाहिरात मागे घेतल्यानंतर मंडल यांनी ट्विटमध्ये लिहिलं,” सगळ्यांनी विरोध केल्यानंतर झोमॅटोने जातियवादी जाहिरात मागे घेतली. अभिनंदन आणि धन्यवाद, स्वाभिमानाशी तडजोड नाही. झोमॅटोने जबाबदार लोकांवर कारवाई करावी”

कोण आहे कचरा –

२०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘लगान’ चित्रपटात ‘कचरा’ नावाची दलित व्यक्तिरेखा दाखवण्यात आली होती. तर या पात्राचे नाव ‘कचरा’ ठेवल्यामुळे यापूर्वीही त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. आशुतोष गोवारीकर यांच्या या चित्रपटात आमिर खानने मुख्य भूमिकेत काम केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomato finally withdraws controversial kachra advertisement the company took the decision due to the growing opposition of netizens jap
First published on: 08-06-2023 at 17:17 IST