ऑनलाईन फूड अॅपमुळे अनेकांचे जीवन सुलभ झाले आहे. काही खायची इच्छा झाल्यास पटकन ऑनलाईन जेवण मागवता येते आणि आपल्याला घरपोहच हवा तो पदार्थ मिळतो. पण ग्राहाकाला चुकीची ऑर्डर दिल्यास सहाजिकपणे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो, विशेषत: जेव्हा काही ग्राहकांना. शाकाहारी ग्राहकाने ऑनलाईन शाकाहारी पदार्थ मागवले पण चुकून त्याला नॉन व्हेज पदार्थ दिले तर त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. काही दिवसांपूर्वीच एका ग्राहकाने चिली पनीर ऑर्डर केले होते आणि त्याला चुकून चिली चिकन देण्यात आले. ते खाऊन त्याच्या कुटुंबाचे तब्येत बिघडल्याने त्याने रेस्टॉरंट आणि फूड डिलव्हरी बॉयविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान असाच काहीसा प्रकार आणखी एका ग्राहाकासह घडल्याचे समोर येत आहे.

ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटोच्या अॅप वापरून मॅकडॉनल्डमधून शाकाहारी जेवण मागवले होते पण त्याला मासंहारी जेवन देण्यात आले. या चूकीसाठी झोमॅटो आणि मॅकडॉनल्डला तब्बल १ लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे. जोधपुरमध्ये जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने (द्वितीय) दोन्ही कंपन्यांवर दंड ठोठवला आहे. झोमॅटोने शुक्रवारी शेअर बाजारला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले, कंपनीने या आदेशाविरोधात अपील दाखल केली आहे.

हेही वाचा – शाकाहारी कुटुंबाने स्विगीवरुन मागवले चिली पनीर, मिळाले चिली चिकन; रेस्टॉरंट मालकासह डिलिव्हरी बॉयविरोधात तक्रार दाखल

कंपनीने सांगितले की, जोधपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने (द्वितीय) झोमॅटो आणि रेस्टॉरंट पार्टनर मेकडॉनल्डवर ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे उल्लंघन केल्याबाबत १ लाख रुपये दंड ठोठवला आहे. तसेच खटल्याचा खर्चाची रक्कम ५ हजार रुपये दंडही भरण्यास सांगितले आहे. मेकडॉनल्ड्सद्वारे या ऑर्डरची डिलिव्हरी करण्यात आली होती.

झोमॅटो आणि मॅकडोनाल्डने आर्थिक दंड आणि खटल्याचा खर्च संयुक्तपणे भरावा लागेल, असे ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे. झोमॅटोने सांगितले की वकिलांच्या सल्ल्यानुसार या आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कंपनीने म्हटले आहे की, ‘सध्याचे प्रकरण शाकाहारी जेवणाऐवजी मांसाहारी जेवणाच्या चुकीच्या डिलिव्हरीशी संबंधित आहे.’

हेही वाचा – शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

झोमॅटोच्या मते, ग्राहक आणि कंपनी यांच्यातील संबंध नियंत्रित करणाऱ्या सेवा अटी स्पष्टपणे सांगतात की, ते (झोमॅटो) खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी केवळ एक सुविधा देणारे व्यासपीठ आहे. सेवेतील कोणतीही कमतरता, ऑर्डरची चुकीची डिलीव्हरी आणि गुणवत्तेसाठी रेस्टॉरंट भागीदार कंपनी जबाबदार आहे.