Zomato Viral Food bill note: कधीकधी एक छोटीशी विनंती मोठी कहाणी सांगून जाते. या व्हायरल बिलामध्येही असंच काहीसं दडलंय, जे वाचून लोक खळखळून हसतही आहेत आणि बिचाऱ्या ग्राहकाची व्यथा समजूनही घेत आहेत.
झोमॅटो व्हायरल बिल (Zomato Viral Bill) ऑनलाइन जेवण ऑर्डर करताना लोक अनेकदा विशेष सूचना लिहितात, पण कधीकधी या नोट्स इतक्या मजेशीर असतात की त्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतात. अलीकडेच सोशल मीडियावर एक बिल चर्चेचा विषय ठरलं आहे, ज्यामध्ये ग्राहकाने डिलिव्हरीसाठी अशी काही अजब विनंती केली आहे की, ती वाचून प्रत्येकजण हसायला मजबूर झाला आहे. हा छोटासा मेसेज आता वेगाने शेअर केला जात असून लोक त्यावर मज्जेदार कमेंट्स करत आहेत.
ग्राहकाची अजब पण भन्नाट विनंती
व्हायरल होत असलेल्या या बिलामध्ये Customer Notes सेक्शनमध्ये ग्राहकाने लिहिलं आहे की, “बिल पाठवू नका, तसेच चिकनचा कुठेही उल्लेख नसावा कारण घरी परवानगी नाही, कृपया कटलरी (चमचे इ.) पाठवा.” म्हणजेच हे स्पष्ट आहे की, हा पठ्ठ्या घरच्यांपासून लपून-छपून चिकन ऑर्डर करत होता आणि त्याची चोरी पकडली जाऊ नये अशी त्याची इच्छा होती. हीच बाब नेटकऱ्यांना सर्वाधिक मजेशीर वाटत आहे.
एका ओळीच्या नोटमध्ये मोठी कहाणी
या एका ओळीच्या मेसेजमधून संपूर्ण चित्र स्पष्ट होत आहे की, या ग्राहकाला घरात मांसाहार खाण्याची परवानगी नाही, तरीही त्याने ‘जुगाड’ करून ऑर्डर दिलीच. डिलिव्हरी ॲप्सवर अशा सूचना अनेकदा पाहायला मिळतात, पण आपली ‘सीक्रेट प्लॅनिंग’ इतक्या उघडपणे सांगणारे ग्राहक कमीच असतात. यामुळेच या बिलाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.

सोशल मीडिया युजर्सचे मजेशीर रिअॅक्शन्स
या पोस्टवर युजर्स जोरदार कमेंट्स करत आहेत. कोणी म्हणत आहे, “भावाचं सीक्रेट मिशन चालू आहे”, तर कोणी लिहितंय, “घरच्यांपासून लपून चिकन खाणं ही सुद्धा एक कला आहे.” काही जण तर याला “रिस्क घेऊन खाण्याची खरी मजा” म्हणत आहेत. एकूणच, ही छोटीशी नोट सध्या इंटरनेटवर मनोरंजनाचं मोठं साधन ठरली आहे.
