स्वयंपाकघर हे फक्त स्त्रियांचं क्षेत्र आणि स्वयंपाक हे फक्त स्त्रियांचंच काम या समजुतीला छेद देण्याचं काम टीव्हीवरच्या अनेक शोजनी आणि पुरुष शेफनी केलं आहे. पदार्थ तयार करण्याच्या आणि सादरीकरणाच्या आपल्या कौशल्याच्या बळावर त्यांनी हे शो लोकप्रिय केले आहेत.

खाणं आणि खिलवणं आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक. प्राचीन काळापासून अगदी आतापर्यंत खाण्याच्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. यशाचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. पोट आनंदी, समाधानी असेल तर चित्त प्रसन्न राहते. टीव्हीचा पडदा आणि खाणंपिणं यांची जवळीक व्हायला थोडा वेळ लागला. मात्र दैनंदिन मालिकांचे साचेबद्धपणातून बाहेर आल्यावर टीव्हीकर्त्यांना या व्यापक क्षेत्राची जाणीव झाली. टीव्हीवरच्या खवय्येगिरीतून संजीव कपूर या बल्लवाचार्याने आपली मने जिंकली. हिंदीत जनमानसात लोकप्रिय झालेले हे खाऊचं लोण मराठी वाहिन्यांमध्ये आलं. मराठी माणूस खाण्यापिण्यात तरबेज. त्यांच्यावर दैनंदिन मालिकांइतकेच गारूड करणाऱ्या या खाद्यभ्रमंतीविषयी.

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा

स्वयंपाक करणं ही बायकांची मक्तेदारी असताना संजीव कपूर यांनी नवा पायंडा पडला. कुशलतेने कणीक मळण्यापासून, नाजूकसा केक तयार करण्यापर्यंत सर्व गोष्टी पुरुष माणूसही कौशल्याने करू शकतो हा विश्वास संजीव कपूर यांनी दिला. संजीव कपूर येण्याआधीही बल्लवाचार्य मंडळी देशाच्या कानाकोपऱ्यात काम करत होती. मात्र त्यांना मानाचं पान मिळत नसे. पुरुषी समजली जाणारी क्षेत्रं आणि तिथली कामं जमत नाही म्हणून स्वयंपाक अशी हेटाळणी केली जात असे. मात्र संजीव कपूर यांच्या माध्यमातून हा दृष्टिकोन हळूहळू बदला. पुरुषमंडळीही उत्तम स्वयंपाक करू शकतात हे ठसलं. या ठसण्याला टीव्हीची जोड मिळाल्याने हा संदेश देशभर पोहचला. हॉटेल मॅनेजमेंट, केटिरग या क्षेत्रात कार्यरत मंडळींना सन्मान मिळू लागला. संजीव कपूर यांचा ‘खाना खजाना’ या कार्यक्रमाने दर्दी खवय्यांच्या मनात स्थान पटकावलं. स्वयंपाक करतानाच ओघवत्या बोलण्याद्वारे पॅन इंडिया असा व्यापक जनाधार या कार्यक्रमाला मिळाला. मराठी मनोरंजन वाहिन्या सुरू झाल्यावर प्राधान्य दैनंदिन मालिकांना होते. मात्र मालिका पाहण्याची (पॅसिव्ह) गोष्ट असते. मालिका पाहताना बरं वाटणं, रडणं, हसणं, दु:ख व्यक्त करणं एवढंच हाती असतं. सहभागी होता येईल, कृती करता येईल असं काहीच मराठी प्रेक्षकांकरता नव्हतं. आम्ही सारे खवय्ये, मेजवानी रंगतदार रेसिपीज, सुगरण या कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांना वाहिनीशी जोडलं जाण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमांच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना विष्णू मनोहरजींच्या रूपात आपले संजीव कपूर मिळाले. खाण्यावर नितांत प्रेम, पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास, महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची तपशीलवार माहिती, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खाद्य पॅटर्न्‍सची जाण, विविध स्तरातल्या आणि वयोगटाच्या माणसांना बोलतं करण्याची हातोटी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व यामुळे विष्णू मनोहर हे नाव घराघरात पोहचलं. गृहिणी आणि वर्किंग वुमन या दोन्ही प्रकारातील महिलांना सहजतेने करता येतील अशा रेसिपींमुळे विष्णूजी लोकप्रिय झाले. विष्णूजी बघा कसे सुरेख पदार्थ तयार करतात, नाही तर तुम्ही, असे उपरोधिक टोमणेही पुरुषमंडळींना ऐकू येऊ लागले. किचन म्हणजे फक्त महिला ही चौकट विष्णूजींच्या निमित्ताने मोडली गेली आणि पुढे त्याचा झालेला विस्तार प्रशंसनीय आहे. विष्णूजींच्या बरोबरीने शेफ अमर नाईक यांनीही साध्या, सोप्या रेसिपींनी खवय्यांची मने जिंकली. एकापेक्षा फक्कड पदार्थ तयार करणारे आणि उत्तम बोलणाऱ्या बल्लवाचार्याची एक फौजच या कार्यक्रमांच्या निमित्ताने आपल्यासमोर आली. नीलेश लिमये, पराग कान्हेरे, तुषार देशमुख, प्रसाद कुलकर्णी, देवव्रत जातेगावकर अशा सुगरण मंडळींना उत्तम व्यासपीठ मिळालं. महाराष्ट्रातल्या खाद्यसंस्कृतीचा आढावा घेत असतानाच देशभरातल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असंख्य खाद्यसंस्कृतीची माहिती झाली. एखाद्या कोऱ्या कॅनव्हासवर कलाकाराने चित्र रेखाटावे त्याप्रमाणे ही मंडळी भराभर अत्यंत व्यावसायिक पद्धतीने पदार्थ तयार करून आपल्यासमोर सादर करतात की तोंडाला पाणी सुटावं.

या कार्यक्रमांच्या निमित्ताने पदार्थ तयार करतानाच बेकिंग, कन्फेक्शनरी, प्लेटिंग, मांडणी अशा तांत्रिक मुद्दय़ांबाबतची साक्षरता वाढली. पदार्थ तयार करण्याच्या कौशल्याबरोबरच स्वच्छता किती महत्त्वाचा पैलू आहे याची जाणीव प्रेक्षकांना झाली. पदार्थाची चव उत्तम असणे आवश्यक आहे. मात्र पदार्थाचं दिसणंही सुबक असेल तर भूक आणखी चाळवते. स्वयंपाक म्हणजे ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ या कष्टप्रद प्रतिमेतून आनंददायी प्रक्रियेकडे नेण्यात या कार्यक्रमांचा मोलाचा वाटा आहे. रोज सहज मिळणाऱ्या गोष्टींची आपल्याला किंमत राहत नाही. कोणीतरी राबतंय म्हणून आपलं चाललंय हे विसरायला होतं. भाज्या आणि किराणा माल आणणं, त्याची उस्तवार करून जागेजमी ठेवणं, ऋतु- घरातील माणसांची संख्या निमित्त लक्षात घेऊन रोज स्वयंपाक करणं, चवीत बदल करत राहणं, लहान मुलांसाठी काहीतरी वेगळं करणं, आजारी मंडळींसाठी उपयुक्त बनवणं हे चौरस स्वरूपाचं काम आहे. ३६५ दिवस, २४ तास हे बॅकऑफिस सुरूच असतं. मात्र आपल्या वाटचालीत, यशात या बॅकऑफिसची नोंद अभावानेच होते. टीव्हीवर पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया दिसू लागल्यानंतर या ऑफिसची व्याप्ती अनेकांना समजली. घराबाहेर पडून, प्रवास करून विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांप्रमाणे किचनआघाडी सांभाळणंही तितकंच कौशल्याचं आणि अवघड काम असल्याची प्रचीती या कार्यक्रमांमुळे झाली. एकापरीने स्वयंपाकघराच्या स्वामिनीच्या कामाला सन्मान मिळवून देण्यात या कार्यक्रमांची भूमिका महत्त्वाची आहे.

पदार्थ तयार करणारा माणूस प्रक्रियेत गुंततो. त्याला त्याच्या आयुष्याविषयी बोलतं करण्यासाठी निवेदक लागतो. या दोघांच्या संवादातून फर्मास पदार्थ तयार होतो. प्रशांत दामले यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे. ‘आम्ही सारे खवय्ये’च्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू समोर आला. खाण्याची आवड त्यांना आहेच मात्र तयार करण्याच्या प्रक्रियेतही ते सहभागी होतात. सिद्धहस्त अभिनेता असूनही ही वेगळी वाट चोखाळण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आणि चाहत्यांनी त्याला भरभरून पसंती दिली. नावाला असणाऱ्या वलयाचं दडपण समोरच्या माणसावर येऊ न देता उत्स्फूर्त बोलणं ही त्यांची खासियत. पदार्थ होता होता ते खुबीने पंचेस, कोटय़ा, टोमणे यांची पखरण करतानाच समोरच्याला बोलतं करतात. प्रशांत दामलेंबरोबर वावरता येईल या ओढीने अनेकांनी सहभाग नोंदवला. ‘टॅलेंट हंट’ स्वरूपाच्या कार्यक्रमातून चाहत्यांसमोर आलेला संकर्षण कऱ्हाडे आता घराघरात पोहचला आहे. जाईल तिथे आपलंसं करणारा संकर्षण आता या कार्यक्रमाचा अविभाज्य घटक झाला आहे. या दोघांच्या आधी राणी गुणाजी यांनी सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीपणे हाताळली होती. सहजसुंदर अभिनयासाठी कविता लाड-मेढेकर ओळखल्या जातात. ईटीव्हीवरच्या मेजवानी रंगतदार रेसिपीजच्या यशात कविता लाड यांचा वाटा मोलाचा आहे. अफलातून संवाद कौशल्य, प्रसिद्ध अभिनेत्री हा टॅग कॅरी न करता कोणत्याही स्तरातल्या तसेच वयोगटातल्या माणसाला त्यांनी बोलतं केलं. मुळातच पदार्थ तयार करण्याची आणि त्याच्या तपशिलात शिरण्याची त्यांची आवड यानिमित्ताने चाहत्यांसमोर आली. अनेक वर्षे एकहाती त्यांनी मेजवानीचं निवेदकत्व समर्थपणे सांभाळलं. कविता लाड यांच्यानंतर लोकेश गुप्ते आणि चैत्राली गुप्ते यांनीही ही कमान हाताळली. गिरिजा ओक-गोडबोले यांनी या पायावर कळस चढवला. उच्चशिक्षित आणि दर्जेदार अभिनेत्री असणाऱ्या गिरिजा यांनी सहज प्रवाही बोलण्याने खवय्यांना आपलंसं केलं. घोटीव उच्चार, भाषेची उत्तम जाण, पदार्थाविषयी र्सवकष जाणून घेण्याची आवड यामुळे गिरिजा यांनी मेजवानीला आणखी उंचीवर नेलं. साम टीव्हीवरच्या ‘सुगरण’चाही खास प्रेक्षकवर्ग आहे. या कार्यक्रमाचे निवेदक सातत्याने बदलतात. सुप्रिया कुऱ्हाडे-नारखेडकर, सायली देवधर, परी तेलंग, धनश्री काडगावकर, रचना विचारे, धनश्री प्रधान, विभावरी प्रधान, मयूरी वाघ, योगिनी चौक, चैतन्य चंद्रात्रे यांनी ही जबाबदारी उत्तमपणे सांभाळली आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून निवेदन करणाऱ्या युवा अभिनेता/ अभिनेत्रींना मालिकेत, चित्रपटात काम मिळाल्याचंही उदाहरणं आहेत.

दैनंदिन मालिकांमध्ये तोचतोचपणा येतो. आपली खाद्यसंस्कृती अफाट असल्याने या कार्यक्रमांना चिंता नसते. काय दाखवायचं हा प्रश्नच उद्भवत नाही. सुरुवातीला मराठमोळ्या खाद्यपदार्थाभोवती केंद्रित या कार्यक्रमांनी राज्याची वेस ओलांडली. अन्य राज्यांतली खाद्यसंस्कृती मांडली. या बरोबरीने इटालियन, थायी, चायनीज, काँटिनेंटल अशा असंख्य प्रकारचे पदार्थ घरच्या घरी कसे तयार करायचे याची माहिती मिळू लागली. मायक्रोवेव्ह ओव्हन नसेल तर केक, पिझ्झा तयार करता येत नाही अशी समजूत होती. मात्र हेही पदार्थ घरी उपलब्ध सामुग्रीत होऊ शकतात हा विश्वास प्रेक्षकांना मिळाला. हे पदार्थ हॉटेलमध्ये खाण्याचे असा गैरसमज होता. या कार्यक्रमातील वैैविध्यामुळे पंजाबी सब्जींच्या ग्रेव्हीपासून चॉकलेट मूसपर्यंत सगळं मंडळी घरी करायला शिकली.

प्रत्येक घरात सुगरण असते. पण हे कौशल्य स्वयंपाकघरापुरतं मर्यादित राहतं. या कार्यक्रमांच्या निमित्ताने राज्यभरातल्या असंख्य महिलांना आपलं कौशल्य जगासमोर मांडण्याची संधी मिळाली. पदार्थ तयार करताना काय काळजी घ्यावी, पदार्थ नीट व्हावा किंवा फसू नये म्हणून काय क्लृप्त्या कराव्या याची माहिती अन्य मंडळींना झाली. आपल्या घरात, नातेवाईंकामध्ये आणि फारतर सोसायटीत प्रसिद्ध असणाऱ्या वहिनी टीव्हीच्या माध्यमातून जगभर पोहचल्या. आपण घरी म्हणजे नॅनो पातळीवर पदार्थ तयार करतोय. हेच काम ग्रँड पातळीवरही होऊ शकतं हा विश्वास सुगरणींमध्ये रुजला. कॅमेरा फेस करणं, पदार्थ करताना निवेदकाशी बोलणं या सगळ्यात अनेकजणी तरबेज झाल्या.

या कार्यक्रमांसाठी प्रत्येक वाहिनीने उत्तम निर्मित्तीमूल्यं जपली. आदर्श वाटावं अशा किचनचा सेट, डोळ्यांना सुखावणारी क्रोकरी, फोडणीपासून तंदुपर्यंत सगळ्याचा सर्वागीण वेध घेणारे कॅमेरे यामुळे हे कार्यक्रम देखणेही झाले. आपल्यासमोर येणारा भाग अध्र्या तासाचा असतो. मात्र ते अंतिम स्वरूप असतं. आलेला पाहुणा डमी किचनमध्ये पदार्थ तयार करून पाहतो. साधनसामग्रीची जुळवाजुळव करण्यासाठी एक चमू सज्ज असतो. त्यांच्या अविरत मेहनतीमुळेच कार्यक्रम पाहताना पाहुण्याच्या वावरण्यात सराईतपणा दिसतो. पडद्यावर दिसणारी माणसं आपलीशी वाटण्यासाठी त्यांचे कपडे आणि मेकअप सुसंगत असणे आवश्यक असते. या सगळ्या कार्यक्रमांनी या गोष्टी अचूकपणे जपल्या आहेत. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संशोधन चोख असणं आवश्यक असतं. कार्यक्रमात एकसुरीपणा येऊ नये यासाठी काही कप्पे पाडले गेले. लहान मुलांसाठी डबा, बेसिक स्वयंपाक, पंजाबी ग्रेव्हीज, डेझर्ट्स, कॉकटेल्स, सूप्स, वरिष्ठ नागरिक मंडळींसाठी असे सेगमेंट करून रेसिपी दाखवण्यात आल्या, जेणेकरून सर्वप्रकारच्या प्रेक्षकांना सामावून घेता येतील. प्रेक्षकांना स्टुडिओ स्वयंपाकघरात बोलवतानाच निवेदक आणि बल्लवाचार्य थेट प्रेक्षकांच्या घरी जाऊन पदार्थ करू लागल्याने आपलेपणा वाढला. प्रांतोप्रांतीच्या असंख्य रेसिपी समोर आल्या.

या सगळ्या कार्यक्रमांची वेळ ही त्यांची जमेची बाजू आहे. घरातल्या गृहिणी स्वयंपाकघरातलं काम आटोपून साधारण एक दीडच्या सुमारास मोकळ्या होतात. जेवणं सुरू होतात किंवा झालेली असतात. हे सगळे कार्यक्रम दुपारी एक ते अडीच याच वेळेत असतात. संध्याकाळी प्राइम टाइमच्या वेळेत टीआरपीसाठी रस्सीखेच सुरू असते त्या भयंकर शर्यतीत हे कार्यक्रम नसतातच. त्यांनी स्वत:चा वेगळा प्राइम टाइम झोन निर्माण केला आहे.

(समाप्त)

पराग फाटक response.lokprabha@expressindia.com