X
X

आला मुद्दा लक्षात?

माझ्या मित्राचाही एक असाच अनुभव आहे. त्यानं आपली स्वत:चीच खिल्ली उडवणारी पोस्ट टाकली होती.

अहो, हे काय चाललंय काय? सहज एक पोस्ट केली परवा, की बाबा, मला सध्याचं हवामान फारसं चांगलं नाहीये. गारठा आहे. प्रदूषण वाढलेय. अशा हवेत श्वास घेण्यास त्रास होतो थोडा. तर त्यावर मला थेट शेलक्या शब्दांमध्ये शिव्या दिल्या तुमच्या लोकांनी.

हो का. बरं बरं.

त्याआधीही एक असाच अनुभव आला होता. सहज म्हटलं होतं, की बाबा, मला आपले साधे, सरळ कपडे आवडतात. म्हणजे फुल पँट, हाफ शर्ट वगैरे. त्यात अवघडल्यासारखं होत नाही. आता यात मी काय वावगं बोललो बुवा? तर त्यावरही किती गोंधळ घातला तुमच्या लोकांनी. कपडय़ांवर का घसरता म्हणाले. त्या पोस्टची आणि माझीही पार चिरफाड करून टाकली.

काय म्हणता. बरं बरं.

माझ्या मित्राचाही एक असाच अनुभव आहे. त्यानं आपली स्वत:चीच खिल्ली उडवणारी पोस्ट टाकली होती. की बाबा, माझी छाती साडेबत्तीस इंच असल्याने मला पिस्तूल बघून तेवढय़ा छोटय़ाशा छातीतच धडकी भरते. रणगाडा, मशीनगन, उखळी तोफा वगैरे दूरच राहिले. आता किती प्रांजळ म्हणणं होतं त्याचं. तर तुमच्या लोकांनी त्यावरून त्याला बडवायचाच बाकी ठेवला होता.

असं झालं का. बरं बरं.

दुसऱ्या एका मित्राने अशीच एक पोस्ट सहज केली होती. की बाबा, मला परवा जाताना एक रांग दिसली. त्यात एकही दाढीधारी मनुष्य नव्हता. तर त्यावरून कोण गहजब झाला. तुम्ही असं कसं बोलू शकता. तुम्ही स्वत:ला कोण समजता वगैरे. हे अति होतंय. जरा समजावा की तुमच्या लोकांना.

खूप ऐकलं तुमचं. आता ऐका जरा. तुम्ही, तुमच्या मित्रांनी या पोस्ट कुठे कुठे टाकल्या. त्या टाकण्याआधी कुणाची परवानगी घेतली नसणारच. ते ज्या ग्रुपवर असतील त्याच्या अ‍ॅडमिनचीही परवानगी घेतली नसणारच. आता तुम्ही किंवा तुमचे मित्र ज्या पोस्ट टाकतायत, त्याची जबाबदारी अ‍ॅडमिनवर आहे का? तर नाही. मुळीच नाही. मी म्हणत नाहीये तसं.. न्यायालयंच म्हणतंय. आता मला सांगा, मी कोण आहे?

तुम्ही? तुम्ही तुमच्या लोकांचे प्रमुख.

हो म्हणजे तुमच्या भाषेत अ‍ॅडमिन. आता न्यायालयच म्हणतंय की ग्रुपवरील कुणीही, काहीही पोस्ट टाकली तर त्यास अ‍ॅडमिन जबाबदार नसतो म्हणून. म्हणजे मग आमच्या ग्रुपमधल्या कुणी, काही बोललं तर त्याची जबाबदारी माझ्यावर येत नाही ना. त्यामुळे मग त्यांना समजावण्याची जबाबदारीही माझी नाहीच ना. त्यामुळे इत:पर यासाठी त्यासाठी माझ्याकडे तक्रारी करू नका. हो.. पण तुम्ही पोस्ट करणं चालू ठेवा. मित्रांनाही सांगा तसं. कसं आहे, की आपण जेवढं व्यक्त होऊ तेवढं चांगलं असतं. मनातल्या मनात कुढत बसण्यापेक्षा काय आहे नाही ते एकदा पोस्ट करून मोकळं व्हायचं. आला मुद्दा लक्षात?

23

Just Now!
X