News Flash

केंद्र-राज्य संबंध!

तीही, त्या तीन चाकीवाल्याचे कौतुक करून?  अरे, आम्ही इकडे मरमर राबतोय.

(संग्रहित छायाचित्र)

‘‘हो, झाली असेल आमची चूक. तुम्ही नाही म्हणत असतानाही के ली आम्ही युती. म्हणून काय आता त्याची शिक्षा अशी द्यायची… तीही, त्या तीन चाकीवाल्याचे कौतुक करून?  अरे, आम्ही इकडे मरमर राबतोय. रोज एके क वाभाडे काढतोय आणि तुम्ही या सरकारचे, त्याच्या त्या प्रमुखाचे अभिनंदन करता…  एकमेकांना फोन काय करता… परस्परांवर स्तुतीसुमने काय उधळता. काय चाललेय काय हे? अशा स्थितीत काम तरी कसे करायचे? आम्ही आपले इकडे मुंबईला चांगले दाखवण्याच्या नादात कशी दडवादडवी चाललीय, आकडे कसे लपवले जात आहेत, चाचण्यांचा वेग कसा मंद के ला जात आहे, मृत्यू कसे लपवले जात आहेत ते पुराव्यानिशी समोर आणण्यासाठी धडपडतो आणि तुम्ही ‘थेट संवाद’ साधून ‘वा वा चांगले काम’ म्हणता… अशा उलट्या गिरकीने आमची किती पंचाईत होते, ठाऊक आहे का तुम्हाला? त्या मुंबईचे कौतुक के ल्याबरोबर आम्हाला ‘यू टर्न’ पण घेता येईना! मग ते आयुक्त केंद्रातील अधिकाऱ्यांशी कसे बोलले, केंद्राने त्यांना प्राणवायूसाठी कशी तातडीने मदत के ली, आयुक्तांचे केंद्रात कसे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे मुंबईला सुधारण्यात केंद्राचा कसा हातभार लागला हे आम्हाला ओढूनताणून सांगावे लागले. टीका करणे राहिले दूर… अशा पळवाटा शोधाव्या लागल्या. के वळ तुमच्या त्या कौतुककृतीमुळे. तिकडे आयटीसेलला त्या अधिकाऱ्याच्या विधानाची मोडतोड करायला सांगावे लागले ते वेगळेच. राजकारण हे युद्ध आहे व ते त्याच पद्धतीने लढायला हवे असे तुम्हीच सांगत असताना ना नेहमी… मग मध्येच ही तहाची भाषा कशासाठी? देशात इतकी विरोधी सरकारे आहेत, त्यांचे कौतुक करा ना! इथे कशाला कडमडता? सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास अचानक हिरावल्याने आधीच आम्ही अस्वस्थ. त्यात तुमच्या या कृ तीने जखमेवर मीठ चोळले जाते त्याचे काय? या तीनचाकी रिक्षाने पहिली लाट कशीबशी निभावून नेली. तेव्हाच ठरवले होते, दुसऱ्या लाटेत यांना उघडे पाडायचे. तसे प्रयत्नही सुरू के ले तर तुम्हीच मध्ये आलात. अगदी खरे सांगतो. इथे काहीच बरोबर चाललेले नाही. नुसती बनवाबनवी सुरू आहे. वरुन साऱ्या अपयशाचे खापर हे  रिक्षेवाले तुमच्यावर फोडतात. तरीही तुम्ही त्याची प्रशंसा करता? ‘ब्रेक द चेन’चे सोडा, पण असल्या फोनाफोनीमुळे आम्हाला ‘ब्रेक’ लागला, त्याचे काय? आता तुम्हीच त्यांचे चांगलेपण अधोरेखित के ल्यावर आम्ही कोणत्या तोंडाने त्यांच्यावर तुटून पडायचे? या दुसऱ्या लाटेच्या नियंत्रणाला जनतेचे काळजीयुक्त वागणे, आपल्या पक्षाच्या विविध आघाड्यांनी के लेले प्रयत्न कारणीभूत आहेत. या रिक्षाचा काहीच ‘रोल’ नाही यात. ही वस्तुस्थिती किमान आम्हाला तरी विचारायची ना! उचलला फोन आणि फिरवला नंबर हे बरोबर नाही. आता किमान मुंबईचा मुद्दा तरी आम्हाला सोडून द्यावा लागणार. उद्या तिथे निवडणुका आहेत. मग कशाच्या बळावर सामोरे जायचे हे तुम्ही सांगा आता! खुद्द तुम्ही यालही इथल्या महापालिकेच्या प्रचाराला, पण बरे दिसते का ते ? किमान आपलेच नेते उघडे पडू नयेत याची तर काळजी घ्यायला हवी ना! आता विरोधाची नवी फट शोधायची तरी कशी? ’’ — हा भलामोठा ‘व्हॉईस मॅसेज’ भाऊ व दादांनी तयार करुन दोनतीनदा ऐकला, पण दिल्लीला पाठवायची हिंमत न झाल्याने शेवटी ‘डिलीट’ करुन टाकला. ‘कुंज’ मधून ते बाहेर पडले तेव्हा दोघांचेही चेहरे उतरलेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:02 am

Web Title: center state government relations akp 94
Next Stories
1 ‘सगळे आत्ताच’!
2 विचारांचा व्यायाम..
3 नको ते नऊ…
Just Now!
X