19 January 2018

News Flash

अमिरचा तलाश

तब्बल तीन वर्षांनंतर म्हणजे ‘थ्री इडियट’च्या घवघवीत यशानंतर अमिर खान याचा ‘तलाश’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट शुक्रवारपासून प्रेक्षकांसमोर येत आहे. मुळात अमिरचा चित्रपट म्हणजे वेगळ्या धाटणीचा

प्रतिनिधी | Updated: November 30, 2012 12:15 PM

तब्बल तीन वर्षांनंतर म्हणजे ‘थ्री इडियट’च्या घवघवीत यशानंतर अमिर खान याचा ‘तलाश’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट शुक्रवारपासून प्रेक्षकांसमोर येत आहे. मुळात अमिरचा चित्रपट म्हणजे वेगळ्या धाटणीचा तसेच संवेदनक्षम असाच असतो. या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी अमिरही वेगवेगळे फंडे वापरतो. थ्री इडियटसच्या वेळी अमिर एका हॉटेलमध्ये वेगळे नाव घेऊन उतरला होता.
तसेच त्याने देशातील विविध भागात जाऊन चित्रपटाची प्रसिद्धी केली होती. आता त्याची सर्व मदार आहे ती तलाश या चित्रपटावर. त्यासाठी अमिरने कोणतीही कसर ठेवलेली नाही. हा चित्रपट प्रेक्षकांना निश्चितपणे खिळवून ठेवेल असा विश्वासही त्याने यानिमित्ताने बोलताना व्यक्त
केला आहे.चित्रपटाची कथा कशी आहे तसेच त्यामध्ये सस्पेन्स आहे का या प्रश्नाला उत्तर देण्याचे त्याने टाळत प्रेक्षकांना तो विचार करावयास लावेल, असे उत्तर दिले.

First Published on November 30, 2012 12:15 pm

Web Title: cut it
  1. No Comments.