IPL 2020 स्पर्धा युएईमध्ये सुरू आहे. भारतात असलेला करोनाचा धोका लक्षात घेता ही स्पर्धा देशाबाहेर भरवण्यात आली आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जेव्हा जाहीर करण्यात आले होते, तेव्हा काही सामन्यांची ठिकाणे आणि तारखा सांगण्यात आलेल्या नव्हत्या. पण आज BCCIने या सामन्यांचे वेळापत्रक अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केलं.

प्ले-ऑफ्सचे सामने (सर्व सामन्यांची वेळ भारतीय प्रमाणे वेळेनुसार सायंकाळी ७.३० वा.)

पहिली पात्रता फेरी १ - ५ नोव्हेंबर - गुणतालिकेतील संघ १ vs संघ २ - दुबई

बाद फेरी - ६ नोव्हेंबर - गुणतालिकेतील संघ ३ vs संघ ४ - अबु धाबी

दुसरी पात्रता फेरी - ८ नोव्हेंबर - पहिल्या पात्रता फेरीतील पराभूत संघ vs बाद फेरीचा विजेता - अबु धाबी

अंतिम सामना - १० नोव्हेंबर - दोन्ही पात्रता फेरीतील विजेता संघ - दुबई

याशिवाय, महिलांच्या छोटेखानी IPLच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या. Women’s T20 Challenge असं या स्पर्धेचं हे नाव असून ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत शारजाच्या मैदानावर हे सर्व सामने सायंकाळी ७.३० वाजता खेळले जाणार आहेत. मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि स्मृी मंधाना या तीन क्रिकेटपटू संघांच्या कर्णधार असणार आहेत.

Women’s T20 Challenge वेळापत्रक

४ नोव्हेंबर - सुपरनोव्हाज vs व्हेलॉसिटी

५ नोव्हेंबर - व्हेलॉसिटी vs ट्रेलब्लेझर्स

७ नोव्हेंबर - ट्रेलब्लेझर्स vs सुपरनोव्हाज

गेल्या वर्षी या स्पर्धेचं विजेतेपद सुपरनोव्हाजने जिंकलं होतं.