06 March 2021

News Flash

समजून घ्या : TRP म्हणजे काय आणि तो कसा मोजतात?

टीआरपी घोटाळा उघड केल्याची मुंबई पोलिसांची माहिती

प्रातिनिधिक फोटो

मुंबई पोलिसांनी एका पत्रकार परिषदेमध्ये टीव्ही वाहिन्यांच्या रेटींगसंदर्भातील टीआरपी घोटाळा उघड केल्याची माहिती दिली आहे. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत असल्याचेही मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी सांगितले आहे. मात्र अनेकांना टीआरपी म्हणजे काय, ते कसं मोजतात, ते मोजण्यामध्ये बीएआरसी काय भूमिका बजावते यासारख्या गोष्टींची माहितीच नसते. मात्र या घोटळ्यासंदर्भातील माहिती समोर आल्यामुळे या संस्थेच्या कामकाजाबद्दल आणि पारदर्शकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण टीआरपीबद्दलचे काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

काय आहे प्रकरण?

मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांनी अशा तीन वाहिन्यांची माहिती मिळवली आहे जे उपकरणांबरोबर छेडछाड केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. ही उपकरणे बीएआरसीकडून टीआरपीचे मोजमाप करण्यासाठी वापरली जातात. बीएआरसी एका सेटटॉप बॉक्ससारख्या यंत्राच्या मदतीने टीआरपीसंदर्भातील डेटा गोळा करते. वापरकर्ते कोणत्या वाहिन्या पाहतात याची नोंद या यंत्रांच्या माध्यमातून ठेवली जाते. याच आकडेवारीच्या आधारे टीआरपी निश्चित केला जातो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मोजक्या ग्राहकांच्या माध्यमातून कोणत्या वाहिन्या सर्वाधिक काळासाठी पाहिल्या जातात याची आकडेवारी गोळा करुन त्याच्या सरासरीच्या आधारे टीआरपी ठरवला जातो.

बीएआरसी काय आहे?

बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सील (बीएआरसी ज्याला बार्क असंही म्हणतात) इंडिया नावाचा एक संयुक्त उद्योग उपक्रम आहे. हा उपक्रम प्रसारणकर्ते (आयबीएफ), जाहिरातदार (आयएसए) आणि जाहिरात तसेच प्रसारमाध्यमांशी संबंधित संस्थेचे (एएएआय) प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून हाताळला जातो. टीव्ही वाहिन्यांच्या कामकाजाचे मोजमाप करणारी ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे. बीएआरसी इंडिया सन २०१० मध्ये सुरु करण्यात आली. या संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

बीएआरसी वापरते आधुनिक तंत्रज्ञान

बार्कचे सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बदलत्या काळाबरोबर जुवळून घेणे. बार्ककडून देण्यात येणारे रेटींग हे पूर्णपणे सुरक्षित आणि भविष्यातील तांत्रिक बदलानुरुप घडत जाणारी यंत्रणा असल्याचे सांगण्यातयेते. तर बार्क इंडिया टीव्ही पाहणाऱ्या दर्शकांचे योग्य पद्धतीने मोजणी करुन पारदर्शपणे त्यासंदर्भातील आकडेवारी गोळा करण्याचं काम करते.

हंसाला कंत्राट पण हंसाने केलेली तक्रार

बार्क इंडिया ऑडियो वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाचा वापर करुन टीव्ही वाहिन्यांना मिळणारी व्ह्यूअरशिपचे मोजमाप करते. ही यंत्रणा बॅरोमीटरच्या ( BAR-o-meters) माध्यमातून टीआरपीचे आकडे गोळा करते. मुंबईमध्ये जवळजवळ दोन हजार बॅरोमीटर आहेत. बार्कने या बॅरोमीटरच्या देखरेखीसाठी हंसा नावाच्या संस्थेला कंत्राट दिलं आहे. हंसा रिसर्च या कंपनीने यापूर्वीच आपल्या येथे काम करुन गेलेले कंपनीचेच माजी कर्मचारी संस्थेच्या आकड्यांच्या दुरुपयोग करत असल्याची तक्रार केली होती. टीआरपी मॉनेटरिंग सिस्टीममधील आकडेवारीशी या कर्मचाऱ्यांनी छेडछाड केल्याचा कंपनीने आरोप केला होता. यामध्ये सध्या कंपनीमध्ये काम करणारे काही कर्मचारीही सहभागी असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 7:49 pm

Web Title: what is barc trp and how it is calculated scsg 91
Next Stories
1 ‘कारभारी लयभारी’! निखिल चव्हाणची नवी मालिका लवकरच
2 वर्धा : करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबास ५० लाखांचा धनादेश
3 Hathras Gangrape : ‘ओढणी गळ्यात टाकून तिला खेचत नेलं आणि…’; जाणून घ्या १४ सप्टेंबरला नक्की काय घडलं
Just Now!
X