19 January 2018

News Flash

खरे सुख कशात?

सोफिया चौधरीने कोणत्या चित्रपटातून भूमिका साकारली याची नावे सांगता येणे कठीण आहे. काही हरकत नाही, तिलाही त्याचे काही सुखदु:ख नसावे.तिने मात्र 'हंगामा हो गया' या

मुंबई | Updated: November 9, 2012 10:22 AM

सोफिया चौधरीने कोणत्या चित्रपटातून भूमिका साकारली याची नावे सांगता येणे कठीण आहे. काही हरकत नाही, तिलाही त्याचे काही सुखदु:ख नसावे.
तिने मात्र ‘हंगामा हो गया’ या चित्रफितीमध्ये सौंदर्य व नृत्य यांचे समीकरण मांडण्याचा बरा प्रयत्न केला. सारेगामाच्या वतीने या चित्रफितीच्या झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ती आपल्या या कर्तृत्वापेक्षा वाढत्या नामवंत पाहुण्यांमुळे विशेष सुखावलेली वाटली.. प्रीती झिंटा येणार होतीच, पण सोही अली खान, कुणाल खेमू, तुषार कपूर असे करता करता युवराज सिंगही आला व सोफिया जवळपास ओरडलीच. चित्रफीत निर्मितीपेक्षा प्रकाशन सोहळ्याचा आनंद तिला बहुधा जरा जास्तच झाला होता.

First Published on November 9, 2012 10:22 am

Web Title: where is happiness
टॅग Bollywood,Cut It
  1. No Comments.