‘ग्रीक गॉड’ या नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता हृतिक रोशनने २००० साली ‘कहो ना प्यार है ‘या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामुळे हृतिक रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतर एकाहून एक सुपरहिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले त्यातलाच एक चित्रपट म्हणजे अग्निपथ. या चित्रपटातील हृतिकची भूमिका चांगलीच गाजली होती. नुकतीच या चित्रपटाने ७ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने हृतिकने एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१२ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’चा रिमेक व्हर्जन असलेल्या हृतिकच्या या चित्रपटाला २६ जानेवारीला ७ वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाच्या काही आठवणींमुळे भावूक झालेल्या हृतिकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात हृतिक हरिवंश राय बच्चन यांची कविता वाचून दाखवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अग्निपथ हा चित्रपट मला जीवनात मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. माझ्यासाठी ते एखाद्या भेटवस्तू पेक्षा कमी नाही. काम करताना जोखीम पत्करायला लावणाऱ्या फार कमी स्क्रिप्ट असतात.त्यातलाच हा एक चित्रपट. या चित्रपटामध्ये अभिनयासोबत साहसदृष्यांवरही भर देण्यात आला होता. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, असं हृतिकने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे.

पुढे तो असंही लिहीतो, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चं चित्रीकरण सुरु असताना करण जोहरने मला या चित्रपटासाठी विचारलं. यासाठी त्याने करण मल्होत्राला माझ्याकडे विचारणा करण्यासाठी पाठवलं होतं. त्यावेळी अशा मोठ्या चित्रपटाचा रिमेक बनवण्याची कल्पना मला जराही मान्य नव्हती. पण मी चित्रपटाची कथा ऐकली आणि त्याला नकार देऊ शकलो नाही. यानंतरचा माझा प्रवास साऱ्यांनाच माहित आहे’.

दरम्यान, अग्निपथच्या आठवणींमध्ये भावूक झालेल्या हृतिकचा आगामी चित्रपट ‘सुपर ३०’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र त्यानंतर अचानक प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agneepath hrithik roshan emotional and shares his heartfelt experience
First published on: 27-01-2019 at 14:33 IST