scorecardresearch

पुणे : दहशत माजविण्यासाठी पिस्तुल बाळगणारा गजाआड ; सिंहगड रस्त्यावर पोलिसांची कारवाई

दहशत माजविण्यासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला पोलिसांनी सिंहगड रस्ता परिसरात पकडले.

man arrested
( संग्रहित छायचित्र )

पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त
दहशत माजविण्यासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला पोलिसांनी सिंहगड रस्ता परिसरात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

मनीष प्रकाश घडशी (वय २२, रा. सानेगुरुजीनगर, आंबीलओढा वसाहत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. घडशी सराईत असून त्याच्या विरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. परिसरात दहशत माजविण्यासाठी घडशीने पिस्तुल बाळगल्याची माहिती दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे, दत्ता मरगळे, अमीर पटेल, अमित सुर्वे यांना मिळाली. त्यानंतर भंडारी हाॅटेलजवळ सापळा लावून त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, चंद्रकांत कामठे, दयानंद तेलंगे, नवनाथ भोसले, अमित चिल्ले आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arrested for carrying a pistol to terrorize on sinhagad road pune print news amy

ताज्या बातम्या