प्रकाश झा यांच्या सेटवर बजरंग दलाचा हल्ला

आश्रम-३’ या नावाला आक्षेप घेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरणस्थळी जाऊन हैदोस घातला.

भोपाळ : चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या ‘आश्रम-३’ या वेबसीरिजच्या चित्रीकरणस्थळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी हल्ला केला.भोपाळमध्ये हे चित्रीकरण सुरू होते. ‘आश्रम-३’ या नावाला आक्षेप घेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरणस्थळी जाऊन हैदोस घातला. त्यांनी चित्रीकरणस्थळी तोडमोड करून प्रकाश झा यांच्यावर शाई फेकली. हिंदूंची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आल्याचा आरोप करत बजरंग दलाने या वेबसीरिजचे चित्रीकरण चालू देणार नाही, असा इशाराही दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bajrang dal activists attack ashram 3 sets throw ink on prakash jha zws

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या