मरोळ आगारमधून सुटणारी २२ क्रमांकाच्या मार्गावरुन जाणाऱ्या बसचा दादर येथे भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार बस वाहक- बस चालक तसेच ७-८ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची दृष्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात घडला. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने टाटा टीटी सर्कलजवळ बसने सिग्नलवर उभ्या असणाऱ्या डम्परला धडक दिली. अपघातग्रस्त वाहनांना बाजूला काढून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आलाय.
या अपघातामध्ये आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
four people drowned, died, Vasai, Mira Road
वसई आणि मिरा रोड मध्ये दुर्घटना, एकाच दिवशी ४ जणांचा बुडून मृत्यू
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू

या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये ५३ वर्षीय बस चालक राजेंद्र आणि ५७ वर्षीय कंडक्टर काशीराम धुरी यांचाही समावेश आहे. हे दोघेही गंभीर जखमी आहेत. त्याचप्रमाणे या गाडीमधून प्रवास करणारे ताहीर हुसैन (वय ५२), रुपाली गायकवाड (वय ३६), सुल्तान (वय ५०) हे तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत. तर १६ वर्षीय श्रावणी मस्के, १७ वर्षीय वैदेही बामणे आणि ५२ वर्षीय मन्सूर यांची प्रकृती स्थिर आहे. सर्व जखमींना सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय.

हा अपघात कसा झाला याची आता चौकशी केली जात आहे.