टांगा पलटी 'गाय' फरार! विधानसभेत गाय घेऊन आलेल्या भाजपा आमदारासोबत घडलं भलतंच, पाहा VIDEO | BJP MLA suresh singh rawat bring cow at rajasthan assembly cow run away watch video rmm 97 | Loksatta

टांगा पलटी ‘गाय’ फरार! विधानसभेत गाय घेऊन आलेल्या भाजपा आमदारासोबत घडलं भलतंच, पाहा VIDEO

‘लम्पी स्कीन’ आजाराकडे सरकारचे लक्ष वेधण्याठी राजस्थानमधील भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश सिंह रावत विधानसभेत गाय घेऊन आले होते.

टांगा पलटी ‘गाय’ फरार! विधानसभेत गाय घेऊन आलेल्या भाजपा आमदारासोबत घडलं भलतंच, पाहा VIDEO
फोटो- ट्विटर/@SurrbhiM

सध्या देशभर अनेक ठिकाणी ‘लम्पी स्कीन’ आजाराचा संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधीय शेकडो गायींचा मृत्यू झाला आहे. या आजारावर नियंत्रण ठेण्यासाठी सरकारकडून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान, ‘लम्पी स्कीन’ आजाराकडे सरकारचे लक्ष वेधण्याठी राजस्थानमधील भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश सिंह रावत विधानसभेत गाय घेऊन आले होते. पण त्यांच्यासोबत भलताच प्रकार घडला आहे.

विधानसभेच्या आवारात पोहोचण्यापूर्वीच रावत यांनी आपल्यासोबत आणलेली गाय पळून गेली आहे. हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

हेही वाचा- “याचा मेंदू सडलाय आणि डोकं…” एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर हल्लाबोल!

भाजपा आमदार सुरेश सिंह रावत विधानसभेच्या गेटबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी गळ्यात दोरी बांधलेली गाय त्यांनी सोबत आणली होती. मात्र, पुढच्याच क्षणात गाय पळून गेली आहे. यावेळी गायीची दोरी पकडलेल्या व्यक्तीला गायीने ओढत नेलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियात नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार रावत म्हणाले की, राज्यात ‘लम्पी स्कीन’ संसर्गाने गायींना ग्रासलं आहे, मात्र राज्य सरकार अद्याप गाढ झोपेत आहेत. या रोगाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी विधानसभा परिसरात गाय आणली होती.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नोएडा : भिंत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकले असण्याची भीती!

संबंधित बातम्या

‘I Have Got News’, श्रद्धाचं शेवटचं चॅट आलं समोर, मृत्यूच्या काही तास आधीच मित्राला पाठवला होता मेसेज
“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
Photos: विक्रम गोखलेंच्या निधनाने शोककळा, अंतिम दर्शनावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर
“मी गायब झालोय असं रोज वाचनात येतं पण…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतने सांगितली सत्य परिस्थिती
गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती
कुमार सोहोनी आणि प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार
पालकांसाठी ‘बालभारती’ची उजळणी..