मोकळेपणाने दारू पिता यावी आणि सिगरेट ओढता यावी यासाठी चीनमधला एक माणूस गेल्या १४ वर्षांपासून चक्क विमानतळावर राहत होता. साधारण ६० वर्षे वय असणारा वेई जियाग्वो २००८ सालापासून बिजींगमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर राहतोय. वाटलं ना नवल? जाणून घ्या याबद्दल सविस्तर…


चायना डेलीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेईने सांगितलं की, तो वयाच्या चाळिशीत असताना त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर वय वाढत गेल्याने कोणतीही नोकरी मिळणं अवघड होऊन बसलं. आपल्या सध्याच्या दिनक्रमाबद्दल बोलताना वेई म्हणाला की तो रोज सकाळी मार्केटमध्ये जातो आणि आपला नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी काही पदार्थ घेऊन येतो. त्यासोबतच तो बाईजू या चिनी दारूची एक बाटलीसुद्धा बरोबर घेऊन येतो. त्याला त्याच्या घराबद्दल विचारलं असता, तो सांगतो की, मला परत घरी जायचं नाहीये कारण मला तिथे कसलंच स्वातंत्र्य मिळत नाही. माझ्या घरच्यांनी मला सांगितलं की जर घरात राहायचं असेल तर दारू आणि सिगरेट सोडणं गरजेचं आहे. मी जर ते केलं नाही, तर मला सरकारकडून मिळणारा सगळा भत्ता घरच्यांना द्यावा लागेल. पण मग मी माझी दारू आणि सिगरेट कशी खरेदी करणार?

gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा
Mangal Budh Yuti
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी


वेईने असेही म्हटले आहे की दिवसाची वेळ कोणती आहे याची त्याला अनेकदा कल्पना नसते आणि आता प्रवाशांच्या गर्दीमुळे आता त्याला काही त्रास किंवा अस्वस्थही होत नाही. २०१७ मध्ये, ख्रिसमसच्या अगदी आधी, विमानतळ प्राधिकरणाने वेईला जाण्यास सांगितले आणि पोलिसांनी त्याला विमानतळापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या घरी नेले. मात्र, तो काही दिवसांतच विमानतळावर परतला आणि किमान मला विमानतळावर तरी माझे स्वातंत्र्य आहे असं तो म्हणाला.