ठाणे : श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सवाचा काळ संपताच अनेकजण मासांहार सेवनाकडे वळल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांत कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. ब्रॉयलर आणि गावठी कोंबडीच्या दरात प्रति किलोमागे दहा रुपयांनी तर, अंड्याच्या दरात प्रति नग १ रुपयाने वाढ झाली आहे.

श्रावण व गणेशोत्सव संपताच अनेकजण पुन्हा मांसाहाराकडे वळतात. मासळी किंवा मटणाच्या तुलनेत कोंबडी व अंड्याचे दर काही प्रमाणात कमी असतात. त्यामुळे सर्वसामान्य वर्गाकडून कोंबडी आणि अंड्याला नेहमी मोठ्या प्रमाणात मागणी असते. श्रावण आणि गणेशोत्सवाच्या काळात ब्रॉयलर कोंबडी १४० रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी २३० रुपये प्रति किलोने आणि अंडी प्रति नग पाच रुपये दराने विक्री केले जात होते. आता ब्रॉयलर कोंबडी १५० रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी २४० रुपये प्रति किलोने आणि अंडी प्रति नग सहा रुपये दराने विक्री केले जात असल्याची माहिती कोंबडी विक्रेत्यांनी दिली. करोनाकाळात भीतीपोटी कोंबडीची मागणी घटल्यामुळे अनेकांनी पोल्ट्री बंद केल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आवक कमी आहे. येत्या काही दिवसांत मागणी वाढणार असली तरी, त्या तुलनेत कोबंडी आणि अंड्यांचा पुरेसा पुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे कोंबडी, अंड्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

jotiba yatra kolhapur 2024 marathi news
जोतिबाचा डोंगर तीन लाख भाविकांनी फुलला; मंगळवारी मुख्य यात्रा
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
Mukh Darshan Arranged for Devotees on Gudhi Padwa at Pandharpur Temple due to Conservation Work
मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर : औसेकर महाराज

मागणीच्या तुलनेत कोंबडी व अंड्यांचा पुरवठा होत नसल्यामुळे त्यांच्या दरात वाढ होत आहे.    – चंद्रशेखर तेरडे, कोंबडी विक्रेते, ठाणे</strong>