राज्यातील महाविकासआघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता, राज्यभरतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास देखील परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार २२ ऑक्टोबर पासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत. त्यानंतर आता ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बॉलिवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर करत, ‘एक सकारात्मक पाऊल कारण अनेक चित्रपट अडकले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रोहित शेट्टी आणि काही चित्रपट निर्मांत्यांची बैठक झाली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी २२ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहे सुरु करणार असल्याचे म्हटले’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपट निर्माते चित्रपटगृहे सुरु होण्याची वाट पाहात होते. आता २२ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहे सुरु होणार असल्यामुळे सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत. दरम्यान चित्रपट व्यापर विश्लेषक सुमित कडेल यांनी सूर्यवंशी आणि अंतिम हे चित्रपट दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे.

‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. जवळपास वर्षभरापासून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबलेले आहे. आता चित्रपटगृहे सुरु होणार असल्यामुळे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cinema halls of maharashtra will open from october 22 sooryavanshi may be going to released in theater avb
First published on: 25-09-2021 at 18:39 IST