scorecardresearch

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; पगार कमी झाल्याने अकाऊंटंटची आत्महत्या

गणेश यांनी आपल्याच कंपनीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; पगार कमी झाल्याने अकाऊंटंटची आत्महत्या
त्याच्या मृतदेहावर सापडलेल्या चिठ्ठीत त्याने पंतप्रधान मोदींकडे एक मागणी केल्याचं दिसत आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र)

पिंपरी-चिंचवडमध्ये अकाऊंटंट असलेल्या कामगाराने खासगी कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (१ ऑक्टोबर)उघडकीस आली आहे. गणेश विठ्ठल दुधारकर (४५ वर्षे) असं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये माझ्या आत्महत्येस कोणाला जबाबदार ठरू नये असं म्हटलं आहे. गणेश यांनी आपल्या कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीत एका खासगी कंपनीत गणेश हे कंत्राटी पद्धतीवर अकाऊंटंट म्हणून काम पाहात होते. दरम्यान, गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे त्यांना कंपनीने कामावरून काढून टाकल होतं. तेव्हा, त्यांना चांगला पगार होता. पुढे, त्याच कंपनीत सहा महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कामावर घेतलं. परंतु, पगार अर्ध्यावर आणला गेला. त्यामुळे, त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली. याच तणावातून रात्री ऑफिस बॉय घरी गेल्यानंतर गणेश यांनी कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलंय?

“गेल्या वर्षी पगार जास्त होता. आता पगार कमी आहे. यामुळे माझी आर्थिक परिस्थिती बेताची झाली. परंतु, माझ्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये”, असं गणेश दुधारकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. 

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona lockdown caused job loss accountant commits suicide gst

ताज्या बातम्या