शिवसेनेचे बंडखोर आमदार आपआपल्या मतदारसंघामध्ये परतल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना धक्कादायक दावे करण्याबरोबरच उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचं महाविकास आघाडी सरकार नको या मागणीसाठी एकनाथ शिंदेंनी २१ जून रोजी बंड केलं. त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर ३० जून रोजी शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या साऱ्या घडामोडींदरम्यान शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिंदेंना पाठिंबा दिला असून हे ४० आमदार आणि अपक्ष आमदारांच्या जोरावर शिंदे गट आणि भाजपा सरकारने १६४ विरुद्ध ९९ मतांनी विश्वासदर्शक ठरावही जिंकला. शिंदे सरकारमधील भावी मंत्री आणि सरकार समर्थक आमदार आता वेगवेगळे दावे करत असतानाच यवतमाळमधील दिग्रस मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांनीही राष्ट्रवादीसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवतो असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावेळी…”; संजय राऊतांसंदर्भात आमदाराचा खळबळजनक दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राठोड यांनी पत्राकरांशी चर्चा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता असं सांगतानाच शिवसेनेची सध्याची परिस्थिती राष्ट्रवादीमुळे झाल्याचं म्हटलं आहे. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ असं एकीकडे म्हणताचा दुसऱ्या बाजूला राठोड यांनी थेट राष्ट्रवादीमुळेच कायम शिवसेना फुटल्याचं म्हटलंय.

नक्की वाचा >> १३ हजार ३४० कोटींचा ‘तो’ निधी रोखला; अजित पवारांना शिंदे सरकारचा दणका

“आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली ती राष्ट्रवादीनेच फोडली ना? आतापर्यंत बाहेर राहून फोडायचे. आता सोबत राहून मोठ्याप्रमाणात फोडून टाकलं,” असं शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल टीव्ही ९ शी बोलताना राठोड यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Video: “वारकऱ्यांचा जीव महत्वाचा, पैशाचा विचार करू नका, मी खर्च करतो, तुम्ही फक्त…”; अपघातग्रस्तांसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा फोन

पक्षातील उठावानंतर सर्वांचाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मातोश्री’वर परत येण्याचा विचार सुरू असताना, काही व्यक्तींच्या अनावश्यक बडबडीमुळे ते शक्य झाले नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही राठोड यांनी खासदार संजय राऊत यांचा थेट उल्लेख न करता लागवलाय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Every time shivena was broken by ncp says eknath shinde supporter sanjay rathod scsg
First published on: 07-07-2022 at 15:08 IST