heavy rain with lightning in navi mumbai for the second day in a row zws 70 | Loksatta

नवी मुंबईत विजेच्या कडकडाटासह सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस ; ऐरोली दिघ्यात सर्वाधिक पाऊस, रस्ते वाहतूक मंदावली

अवघ्या ३ तासात दिघ्यात सर्वांधिक ८४.७ मिली तर ऐरोली विभागात ८४. ५ मिमी व बेलापूर विभागात सर्वाधिक पाऊस झाला.

नवी मुंबईत विजेच्या कडकडाटासह सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस ; ऐरोली दिघ्यात सर्वाधिक पाऊस, रस्ते वाहतूक मंदावली
जोरदार पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली

नवी मुंबई -नवी मुंबई शहरात  आज सलग दुसऱ्या दिवशी दुपारी ४ नंतर ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. संपूर्ण नवी मुंबईत जोरदार पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस ऐरोली व दिघा विभागात झाला असून शहरातील अनेक ठिकाणी कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या असून एकीकडे  बेलापूर कोकणभवन तसेच नेरुळमधील एमआयडीसी भागात तसेच ऐरोली, दिघा परिसरात पाणी साठण्याच्या घटना समोर आल्या असून  अवघ्या ३ तासात दिघ्यात सर्वांधिक ८४.७ मिली तर ऐरोली विभागात ८४. ५ मिमी व बेलापूर विभागात सर्वाधिक पाऊस झाला.

हेही वाचा >>> मुंबई : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे सलग दुसऱ्या दिवशी हाल

दुपारी ३ नंतरच नवी मुंबई परिसरात सगळीकडे काळोख पसरला होता. जोरदार पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली होती.तर अनेक भागात पाणी साचले होते. संध्याकाळी  पावसाची संततधार सुरु असून ठाणे बेलापूर, तसेच सायन पनवेल महामार्गावर रस्ते वाहतूक मंदगतीने सुरु असल्याचे चित्र आहे. संपूर्ण नवी मुंबईतील बेलापूर ,नेरुळ, वाशी विभागात ऐरोली दिघ्याच्या तुलनेत कमी पाऊस होता. परंतू  कमी वेळात जोरदार पाऊस पडल्याने रस्त्यावरही पावसाचे पाणी साचलेले पाहायला मिळाले. गुरुवारी शहरात  ३ तासातच ८४ मिमी एव्हढ्या पावसाची नोंद झाली आहे. दुपारनंतर पावसाची संततधार सुरु झाली होती. एकीकडे सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने हार्बर व ट्रन्स हार्बर मार्गावर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली नव्हती परंतू रेल्वेस्थानकावर मात्र रेल्वे प्रवाशांची गर्दी झाली होती. ठाणे तसेच पुढे बदलापूर मार्गाकडे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने नवी मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. हवेत गारवा निर्माण झाला आहे   शहरातील बेलापूर,नेरुळ,वाशी,कोपरखैरणे,ऐरोलीसह  विविध उपनगरात  पाऊस झाला असून संततधार पावसामुळे   सायन पनवेल महामार्गावर पावसामुळे वाहनांचा वेग मंदावला होता. तर ठाणे बेलापूर मार्गावरही उड्डाणपुलावर  वाहतूक कोंडी झाली होती. वाशी टोलनाक्यावरही दुपारपासून वाहतूककोंडी झाली होती.शहरात गणपतीपाडा परिसरात पाणी साचण्याची घटना घडली तर रबाळे तलाव परिसरात एक झाडही कोसळले असल्याची माहिती पालिका आप्तकालिन विभागाने दिली .

हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर  रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरु होती. परंतू ठाणे व त्यापुढील मार्गावर मार्गावर रेल्वे वाहतूक २० ते २५ मिनिटे उभीराने सुरु होती.

प्रवीण पाटील,सहाय्यक जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे

गुरुवारी शहरातील ३ तासात झालेला पाऊस

बेलापूर – ५२.१ मिमि

नेरुळ – ६८.१ मिमी. 

वाशी- ४७.१ मिमी

कोपरखैरणे – ४५.४ मिमी

ऐरोली  – ८४.५

दिघा – ८४.७ सरासरी पाऊस – ६३.६५ मिमी

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा ; राज्यव्यवस्था

संबंधित बातम्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजपमध्ये मानाचे स्थान; अमरिंदर सिंग, सुनील जाखड राष्ट्रीय कार्यकारिणीत, शेरगील प्रवक्ते
‘एनआयए’कडून मंगळूरु स्फोटाचा तपास सुरू
‘जी २०’ अध्यक्षपदाचा प्रचार नाटकी; काँग्रेसची टीका
शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात निधीचा ओघ; अलिबाग, मुरुड मतदारसंघात २५२ कोटींचा निधी
छत्तीसगड मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिवास ‘ईडी’कडून अटक; कोळसा घोटाळाप्रकरणी कारवाई