[content_full]

हंडी हा एक लोकप्रिय सण असला, तरी हंडी फोडण्याचा, एखादं टार्गेट अचिव्ह करणं, हाही एक अर्थ आहे. स्वयंपाकातला कुठलाही पदार्थ करायचा असला, तरी त्यात हंडी फोडण्याएवढंच कसब पणाला लागतं. हंडी फोडण्यासाठी कित्येक दिवस तयारी करावी लागते, इतरांबरोबर तोल सांभाळण्याची कसरत करावी लागते, लोकांना सावरण्यासाठीचं कसब पणाला लावायला लागतं आणि सगळ्यात शेवटी शरीर आणि बुद्धी, यांचा मेळ साधून हंडी फोडावी लागते. स्वयंपाकाचंही तसंच आहे. कुठलाही साधा पदार्थ तयार करायचा, तरी त्यासाठी हंडी फोडण्याएवढंच कौशल्य लागतं. फोडणी किती करायची, तेल किती घ्यायचं, त्यात आधी काय टाकायचं, मोहरी किती वेळ तडतडवायची, कांदा किती वेळ परतायचा, किती वेळ वाफ द्यायची, किती वेळ भाजायचं, ह्या सगळ्याचं तंत्र ठरलेलं असतं. ते कुणी सांगून लगेच कळतं असं नाही. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला लागतो, काही वेळा फोडणी जाळावी लागते, कांदा करपवावा लागतो, दूध नासवावं लागतं. त्यातूनच शिकून मग स्वयंपाकाचं योग्य तंत्र जमतं. आणि एकदा ते जमल्यानंतर मग एखाद वेळी बिघडण्याच्या मार्गावर असलेल्या किंवा बिघडलेल्या पदार्थाचंही सोनं करता येतं. आपल्या प्रियजनांना असे बिघडवून सावरललेले पदार्थ मिटक्या मारत खायला बघणं, हा एक वेगळाच आनंद असतो. सांगण्याचा उद्देश काय, की मटण हंडी हासुद्धा मटणाचा एक चविष्ट आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. नेहमीचं मटण, पण ते हंडीत शिजवलं की त्याला एक भन्नाट चव येते. तो उत्तम होण्यासाठी सगळ्या घटकांचं योग्य प्रमाणातलं मिश्रण जमून यायला लागतं. त्याचा खमंग वास आधी नाकात दरवळला आणि नंतर चव जिभेवर रेंगाळली, की हंडी फोडल्याचं समाधान मिळतं.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • १ किलो मटणाचे तुकडे
  • ७ किसलेले कांदे
  • २ इंच आल्याची पेस्ट
  • मीठ
  • अर्धा चमचा साखर
  • ४ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा कोथिंबीर
  • २ कप दही
  • १ लसणाची पेस्ट
  • अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी
  • दीड चमचा लाल मिरची
  • १ चमचा हळद
  • २ बारीक केलेले टोमॅटो
  • १ चमचा गरम मसाला

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • प्रथम मटणाला अर्धी आलं-लसूण पेस्ट व दही लावून दोन तास ठेवा.
  • एका मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीत २ चमचे तेल गरम करून त्यात कांदे लाल होईस्तोवर परता.
  • त्यात लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला घालून परता.
  • त्यात उरलेली आले-लसूण पेस्ट, बारीक केलेले टोमॅटो, मटण व मीठ घालून परता.
  • झाकण लावून झाकणावर पाणी ठेवून मटण शिजू द्या. शेवटी साखर घालून ढवळा, वरून कोथिंबीर पेरा.
  • गरमागरम हंडी मटण जिरा राईस वा रोटीसोबत सर्व्ह करा.

[/one_third]

[/row]