देशात न्यायव्यवस्था शिल्लक असेल तर आम्हाला न्याय मिळेल असे वक्तव्य राष्ट्रवादी चे जयंत पाटील यांनी केलं आहे. देशात न्याय असेल तर आमचा विजय होईल, दहाव्या सूची प्रमाणे पक्षाच्या व्हीप च्या विरोधात मतदान करणाऱ्यांच अपात्र ठरणं साहजिकच आहे. न्याय द्यायचा नसेल तर निकाल लांबणीवर टाकला जाऊ शकतो असे देखील जयंत पाटील यांनी म्हणाले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

जयंत पाटील म्हणाले की, देशात न्याय असेल तर आमचा विजय होईल. देशात न्यायव्यवस्था शिल्लक असेल तर १०व्या सूची प्रमाणे ज्यांनी पक्षाच्या व्हीप च्या विरोधी मतदान केलं आहे त्यांचं अपात्र ठरणं साहजिकच (नैसर्गिक) आहे. पण, न्याय द्यायचा च नसेल तर निकाल लांबणीवर टाकणं हा दुसरा पर्याय आहे. त्यामुळे तो लांबणीवर टाकला जाऊ शकतो, त्यामुळे आम्हाला पण कुतूहल आहे की, या देशांमध्ये सुप्रीम कोर्ट कसं वागतय? त्यांनी जी ऍक्शन घेतली आहे. त्यामुळं या देशातील जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास राहणार की नाही याचा ही निर्णय त्या बरोबर होईल. अस जयंत पाटील म्हणाले .पुढे ते म्हणाले की, राज्यात सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला, तर हे ४० जण किंवा पहिले १६ जण अपात्र ठरतील. त्यानंतर हे सरकार कोसळेल, कारण पहिल्या १६ मध्ये एकनाथ शिंदें च नाव आहे. ते जर अपात्र ठरले तर सरकार कोसळेल. मग राष्ट्रपती राजवट लागून निवडणूका घेतल्या जाऊ शकतात. पुढे ते म्हणाले की, तानाजी सावंतांनी मराठा समाजबाबत केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. तानाजी सावंत म्हणजेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतात. त्या दोघांनी तानाजी सावंतांना बोलण्याची मुभा दिलेली आहे.