भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन हा मैदानावरील वादांसाठी ओळखला जातो. कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने पंचाशी वाद घातला होता. दरम्यान सामन्याच्या तिसर्‍या दिवशी त्याची अनेक वेळा पंचाशी बाचाबाची झाली. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या प्रयत्नानंतरही हे प्रकरण मिटले नाही, तेव्हा प्रशिक्षक राहुल द्रविडला हस्तक्षेप करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज अश्विन सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या गोलंदाजीमुळे पंच नितीन मेनन यांना वारंवार त्रास देताना दिसला. अश्विन चेंडू टाकल्यानंतर पंच नितीन मेनन यांच्यासमोरुन जात होता. यावेळी पंचानी त्याला हटकले. अश्विन सतत समोरून जात असल्यामुळे पंचाना चेंडू नीट दिसत नव्हता आणि कोणत्याही प्रकारच्या अपीलवर तो निर्णय देऊ शकत नव्हते.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz serious dispute between ashwin and umpires in test match rahul dravid takes big step srk
First published on: 27-11-2021 at 13:02 IST