पंजाबमधील १५ वर्षीय जान्हवी बेहलने जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला शनिवारी पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. यंदाच्या १५ ऑगस्ट दिवशी जान्हवी श्रीनगरमधील लाल चौकात राष्ट्रध्वज फडकाविणार आहे. फुटीरतावाद्यांनी मला राष्ट्रध्वज फडकविण्यापासून रोखून दाखवावे, असे खुले आव्हान जान्हवीने यावेळी केले. काही दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यातील या परिसरात फुटीरतावाद्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला होता. त्यामुळे या फुटीरतावाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार जान्हवीने केला आहे. यापुर्वी जान्हवीने कन्हैया कुमारला खुल्या चर्चेचे आव्हान केले होते. स्वच्छ भारत अभियानातील योगदानासाठी तिला २६ फेब्रुवारीला सन्मानित करण्यात आले होते.  कन्हैया विरोधी भूमिका घेणाऱ्या जान्हवीने पंतप्रधान मोदींचे समर्थन केले होते. काहीही न करता बोलणं खूप सोपं असतं. नरेंद्र मोदींची भारतातील नागरिकांनी पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. त्यांच्याविरोधात भाष्य करण्यापेक्षा त्यांच्यासारखं कार्य करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशा शब्दात जान्हवी बेहलने कन्हैयाचा समाचार घेतला होता. तसेच, संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे पण याचा अर्थ आपण मर्यादा ओलांडावी असा होत नाही. कन्हैया कुमार सांगेल तेव्हा आणि सांगेल तिथे त्याच्याबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर खुली चर्चा करायला मी तयार आहे, असे जान्हवीने म्हटले होते. जान्हवी डीएव्ही पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आहे. रक्षा ज्योती फाऊंडेशन या एनजीओची ती सक्रीय सदस्यही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhanvi behal hoist tricolour at lal chowk
First published on: 23-07-2016 at 17:14 IST