सावत्र वडिलांकडून मुलाला मारहाण; रोखण्याचा प्रयत्न केल्याने पत्नीला पेटवले

या घटनेत मीनाक्षी गंभीर भाजल्या गेल्या आहेत.

fire news
संग्रहित छायाचित्र

सावत्र मुलाला मारहाण करताना मध्यस्थी करणाऱ्या बायकोवर पतीने राॅकेल ओतून पेटवून दिल्याची घटना हडपसर भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस अटक करण्यात आली आहे.

आरोपीला पोलिसांकडून अटक

या घटनेत मीनाक्षी सोमनाथ वाघमोडे (वय ४०, रा. मंतरवाडी चौक, देवाची उरळी, हडपसर-सासवड रस्ता) जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी सोमनाथ लक्ष्मण वाघमोडे (वय ४०) याला अटक करण्यात आली आहे. मीनाक्षी यांनी याबाबत लाेणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुलाला मारताना केली होती मध्यस्थी

मीनाक्षी यांचा पहिला विवाह झाला आहे. पतीशी पटत नसल्याने त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी सोमनाथशी दुसरा विवाह केला. सोमनाथने पहिल्या पतीचा मुलगा शेखरला दुचाकी वापरास दिली होती. दुचाकीची चावी परत न केल्याने सोमनाथ त्याच्यावर चिडला होता. सोमनाथने शेखरला घरी बोलावून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मीनाक्षी यांनी भांडणात मध्यस्थी केली. तेव्हा सोमनाथने त्यांच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल ओतले आणि काडीने पेटवून दिले.

पुढील तपास सुरु

या घटनेत मीनाक्षी गंभीर भाजल्या गेल्या आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सोमनाथला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हंबीर तपास करत आहेत.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lit the wife by husband in pune

Next Story
PHOTOS: पावसाळ्यात ‘या’ निसर्गरम्य ठिकाणांवर अवतरतो ‘स्वर्ग’; तुम्हीही नक्की भेट द्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी