‘लागीरं झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे निखिल चव्हाण. उत्तम अभिनयशैली आणि स्मार्टनेस यांच्या जोरावर निखिल आज प्रचंड लोकप्रिय असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे कमी कालावधीत निखिल आज अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. पहिल्याच मालिकेत लष्करातील जवानाची भूमिका साकारणारा निखिल आता, एका राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर ‘कारभारी लयभारी’ या मालिकेची चर्चा सुरु आहे. ही मालिका राजकारणावर आधारित असून यात मुख्य भूमिकेत कोणता कलाकार झळकणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दाटली होती. मात्र, अलिकडेच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून हळूहळू प्रत्येक प्रश्नावरुन पडदा दूर होत असल्याचं दिसून येत आहे. ‘कारभारी लयभारी’ या मालिकेमध्ये अभिनेता निखिल चव्हाण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर या मालिकेचं दिग्दर्शन इंद्रजीत भोसले यांनी केलं आहे.

rss bharat kisan sangh
“शेतकरी आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित”; भारतीय किसान संघाची टीका, आंदोलकांपासून दूर राहण्याचा सरकारला दिला सल्ला
maryam nawaz pakistan s first woman chief minister maryam nawaz sharif in pakistani
विश्लेषण : मरियम नवाझ शरीफ.. बेनझीर भुत्तोंनंतर पाकिस्तानी राजकारणाची दिशा बदलणारी दुसरी महिला!
cbi summoned akhilesh yadav in illegal mining case in uttar pradesh
अवैध खाण प्रकरण: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश
Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये निखिल पहिल्यांदाच एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येत असल्याचं दिसून येत आहे. त्याची बोलण्याची पद्धत, पेहराव आणि भाषण करण्याची स्टाइल अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. तसंच या मालिकेत राजकारणाची जोड असणारी प्रेमकहाणी पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे.दरम्यान, या मालिकेविषयी अद्याप अनेक गोष्टी गुलदस्त्यात आहेत. मात्र, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहे.