करोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता दिवसोंदिवस अधिक जाणवू लागली आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील वेगवेगळ्या भागांमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. थेट फुफ्फुसांवर हल्ला करणाऱ्या करोना विषाणुमुळे ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे मात्र त्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाहीय. त्यामुळेच अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय. सोशल नेटवर्किंगवरही ऑक्सिजन तुटवडा आणि त्यासंदर्भातील बातम्या, मागण्या आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. यातच आता मुंबईतील ऑक्सिजन मॅनची चर्चाही पुन्हा नव्याने होऊ लगाली आहे. मागील वर्षापासून मुंबईमध्ये करोना रुग्णांना मोफत ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या ३१ वर्षीय शहानवाज शेखचं काम अनेकांना प्रेरणा देणारं ठरत असून सोशल नेटवर्किंगवर तो पुन्हा चर्चेत आलाय. अनेकांनी त्याला त्याच्या या कामासाठी कडकडीत सॅल्यूट ठोकला आहे. जाणून घेऊयात शहानवाजने नक्की काय केलं आङे.

मलाडमधील ३१ वर्षीय शहानवाज शेखने मागील वर्षी जून महिन्यात म्हणजेच करोनाबद्दल सर्वत्र भीतीचं वातावरण असताना, स्वत:ची फोर्ड एण्डीव्हर ही महागडी एसयुव्ही गाडी विकून त्यामधून करोनाबाधितांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यास सुरुवात केली. हे काम हाती घेतल्यानंतर पहिल्या तीन आठवड्यांमध्ये शहानवाजने २५० हून अधिक कुटुंबांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवून मदत केली. त्यानंतर त्याने स्वत:ला या कामामध्ये झोकून दिलं.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये शहानवाज आपल्या गाडीचा वापर रुग्णांची ने-आण करण्यासाठी करायचा. मात्र २८ मे २०२० रोजी त्याच्या व्यवसायिक सहकाऱ्याच्या बहिणीचे करोनामुळे निधन झालं. ही महिला सहा महिन्याची गरोदर होती. या महिलेला वेळीच ऑक्सिजन मिळाला असता तर तिचे प्राण वाचले असते असं शहानवाजला समजलं तेव्हा त्याने स्वत:ची गाडी विकून अशापद्धतीने ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याने कोणाचाही मृत्यू होऊ नये म्हणून गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यास सुरुवात केली. ५ जूनपासून शहाजनवाजने अशा पद्धतीने २५० कुटुंबांना मदत केली.

…आणि ऑक्सिजन सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला

“त्या महिलेला तिच्या पतीने पाच रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही तिला दाखल करुन घेतलं नाही. काहींनी बेड उपलब्ध नसल्याचं कारण दिलं. तर काहींनी व्हेंटिलेटर्स नसल्याचं सांगितलं. सहाव्या रुग्णालयाच्या बाहेर रिक्षामध्येच तिची मृत्यू झाला,” असं शहानवाज त्याच्या मित्राच्या बहिणीच्या मृत्यूबद्दलचा हृदयद्रावक अनुभव सांगताना म्हणाला. हा सर्व प्रसंग शहानवाजने त्याच्या काही डॉक्टर असणाऱ्या मित्रांना सांगितला. त्यावेळी त्यांनी तिला वेळेत ऑक्सिजन मिळाला असता तर ती वाचली असती असं शहानवाजला सांगितलं. यानंतरच अशापद्धतीने संकटात अडकणाऱ्यांना मदत करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचार शहानवाजने सुरु केला. त्याने इंटरनेट आणि ओळखीच्या व्यक्तींच्या मदतीने यासंदर्भातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याला बाजारामध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याचे दिसून आले. “माझ्या एका मित्राने मला थेट ऑक्सिजन सिलिंडर बनवणाऱ्याशी संपर्क करुन दिला. मी जेव्हा त्यांना सिलिंडर विकत घेऊन ते गरजूंना मोफत देण्याचा विचार करतोय असं सांगितलं तेव्हा त्यांनाही फार कौतुक वाटलं. त्यानंतर त्यांनी मला खूप मदत केली,” असं शहानवाजने ‘मुंबई मीरर’शी बोलताना सांगितलं होतं.

फक्त दोनच गोष्टी करा…

ऑक्सिजन सिलिंडर विकत घेण्यासाठी शहानवाजने स्वत:ची गाडी विकण्याचा निर्णय़ घेतला. यासंदर्भात शहानवाजने मित्रांच्या मदतीने सोशल नेटवर्किंगवर गाडीसंदर्भातील माहिती पोस्ट करुन ती विकायची असल्याची माहिती शेअर केली. “ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्यांकडून आम्हाला दोनच अपेक्षा असल्याचे आम्ही फोनवर सांगतो. त्यांनी फोन करुन संपर्क साधल्यानंतर ऑक्सिजनची गरज असल्यासंदर्भातील डॉक्टरांचे शिफारस पत्र आणि स्वत: आमच्याकडून सिलिंडर घेऊन जाण्याची व्यवस्था करणे हे तुम्हाला करावं लागेल अशी आम्ही माहिती देतो,” असं शहानवाजने सांगितलं होतं. अगदी आपत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजेच संपूर्ण कुटुंबच क्वारंटाइन झालं असेल तर आम्हीच ऑक्सिजन सिलिंडर नेऊन देतो. आम्ही मालाड ते हजी आली असा प्रवास करुन सिलिंडर पोहचवला आहे. आमचे स्वयंसेवक घरामध्ये प्रवेश करत नाहीत. त्यांनी पीपीई कीट घातलेलं असतं. ते सोशल डिस्टन्सींग पाळतात,” अशी माहिती शहानवाजने दिली.

कसा वापरावा यासंदर्भातील व्हिडिओही केले शूट

“आम्ही प्रत्येक कुटुंबाला ऑक्सिजन कीट देतो आणि तो कसा वापरावा याचे प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडिओ आम्ही डॉक्टर साबुद्दीन शेख यांच्या मदतीने तयार केला,” आहे असं शहानवाज सांगतो. “डॉक्टर शेख यांनी आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मदत केली आहे. त्यांनी आम्हाला इतर तांत्रिक पाठिंबा आणि मार्गदर्शनही केलं आहे. तसेच डॉक्टर शेख प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या डॉक्टरकडून किती दाबाने रुग्णाला ऑक्सिजन द्यायचा आहे यासंदर्भातील माहिती घेऊनच त्याचा वापर करण्याचा सल्ला देतात. मी रुग्णालयाला पर्यायी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करतोय असं नाहीय. मात्र आपण सर्वजण अशाप्रकारे श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या व्यक्तींना मदतीचा हात पुढे करु शकतो,” असं शहानवाज म्हणाला.

…तर मी चार गाड्या विकत घेईन

२०११ साली घेतलेली आवडती गाडी विकताना त्रास नाही झाला का या प्रश्नाला उत्तर देताना शहानवाजने नाही असं सांगितलं. “एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी गाडी विकणे काही कठीण नाही. ही गाडी घेण्यासाठी माझ्या कुटुंबाने मला पाठिंबा दिला असला तरी भविष्यात मी अशा चार गाड्या विकत घेऊ शकतो,” असं शहानवाज सांगतो. विशेष म्हणजे शहाजनवाजच्या गाडीचा नंबरही ००७ या खास शैलीतला होता. “झोपडपट्टीमध्ये अनेक गरीब लोकं राहतात ज्यांना प्रवासाचा आणि रुग्णालयांचा खर्च परवडत नाही. अशा अनेकांना मी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी माझी कार वापरायचो. त्यापैकी अनेकजण हे करोनाबाधित असल्याचं नंतर समोर आलं,” असं शहानवाजने कार रुग्णवाहिका म्हणून वापरत होतो अशी माहिती देताना सांगितले.

शहानवाज खूप काळजी घेत हे काम करत आहे. त्याची पत्नी आणि दोन लहान मुली घरातील एका खोलीत राहतात आणि शहानवाज दुसऱ्या. पूर्णपणे सॅनिटाइज केल्याशिवाय तो स्वत:च्या मुलींजवळही जात नाही.