धुळ्यातील साक्री नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. तब्बल ३५ वर्षांपासून शिवसेना नेते नाना नांगरे यांची नगरपंयातीत एकहाती सत्ता होती. मात्र यावेळी भाजपाने जोरदार मुसंडी मारत नाना नागरे यांचा जोरदार पराभव केला आहे.
साक्री नगरपंचायतीच्या निकालात भाजपाला एकहाती सत्ता मिळाली असून, या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या ४० वर्षांपासून दबदबा असलेल्या नाना नागरे यांनादेखील या निवडणुकीत अपयशाला सामोरे जावं लागलं असून शिवसेनेला फक्त चार जागांवर यश मिळालं आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या साक्री नगरपंचायतीवर भाजपाने ११ जागांवर विजय मिळवत झेंडा फडकल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
काय आहे निकाल
भाजपा: ११
शिवसेना: ४
काँग्रेस: १
अपक्ष: १