सध्या सोशल मीडियावर एक वयस्कर आजी-आजोबांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे रस्त्याच्या शेजारी कांदे पोहे बनवून विकताना दिसत आहेत. हे ७० वर्षांचे आजोबा रस्त्याच्या शेजारी कांदे पोहे का विकत आहेत? ते कोण आहेत? काय करतात? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला आजी-आजोबांचा व्हिडीओ नागपूरमधील टांडापेठ येथील आहेत. ते पंडित नेहरु कॉन्वेंटसमोर कांदे पोहे विकत आहेत. त्यांचा व्हिडीओ फूड ब्लॉगर ‘विवेक आणि आयशा’ यांनी शेअर केला आहे. घराचे भाडे भरण्यासाठी हे आजी-आजोबा रस्त्यावर कांदे पोहे विकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
VIDEO: आयस्क्रीमवाला चकवा देणार इतक्यात चिमुकलीने लढवली अनोखी शक्कल; तुम्हालाही अनावर होईल हसू

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
AI Artist Imagines Summer In Parallel Universe viral photo
‘हाय गर्मी!’ बर्फाची टोपी, अंगावर एसी; भविष्यात असा असेल का उन्हाळा? ‘या’ AI फोटोची होत आहे तुफान चर्चा
funny Puneri patya video
“फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास..” पुणेरी पाटी चर्चेत; नेटकरी म्हणाले, “पुणेकर होण्यासाठी ..”
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

व्हिडीओ शेअर करत त्यांनी, ‘या ७० वर्षीय आजी-आजोबांना घराचे भाडे भरणे कठिण होत आहे. त्यासाठी ते रस्त्याच्या शेजारी कांदे पोहे, चहा विकत आहेत. ते सकाळी ५ वाजता येथे येतात. ते केवळ १० रुपयांमध्ये नागपुरमधील अतिशय लोकप्रिय पोहे विकतात. जवळपास गेली ४ वर्षे हे काम करत आहेत. प्रचंड मेहनत घेत आहेत. पण त्यांनी हार मानलेली नाही’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

या फूड ब्लॉगरने आजी-आजोबांचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्याकडून पोहो खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. ‘आजी-आजोबांचे हे दुकान नागपूरमधील टांडापेठ येथील पंडिच नेहरु कॉन्वेंट समोर आहे. ते सकाळी ६ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत असतात’ असे म्हटले आहे. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.