२४ तासांत ३ करोनाग्रस्तांची भर

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत एकही करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला नाही, तर ३ नवीन रुग्णांची भर पडली. दिवसभरात १० व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या केवळ २२ रुग्णांवर आली आहे.

सक्रीय रुग्णांमध्ये शहरातील १९, ग्रामीणचे ३ अशा एकूण २२ रुग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात शहरात ३ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ४० हजार ३९१, ग्रामीण १ लाख ४६ हजार १९९, जिल्ह्य़ाबाहेरील ६ हजार ८९० अशी एकूण ४ लाख ९३ हजार ४८० रुग्णांवर पोहचली आहे. तर दिवसभरात जिल्ह्य़ात एकही रुग्णाचा मृत्यू नाही. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या ५ हजार ८९३, ग्रामीण २ हजार ६०४, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ६२४ अशी एकूण १० हजार १२१ रुग्ण इतकी होती. दरम्यान शहरात दिवसभरात १ हजार ८७९, ग्रामीणला ८१८ अशा एकूण २ हजार ६९७ संशयितांनी चाचणीसाठी नमुने दिले. ही चाचण्यांची संख्या सोमवारी केवळ १ हजार ५६५ तर रविवारी १ हजार ६० इतकी कमी होती.

करोनामुक्तांचे प्रमाण ९७.९४ टक्के

शहरात दिवसभरात ७, ग्रामीणला ३ असे एकूण १० व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार ४७९, ग्रामीण १ लाख ४३ हजार ५९२, जिल्ह्य़ाबाहेरील ५ हजार २६६ अशी एकूण ४ लाख ८३ हजार ३३७ व्यक्ती एवढी होती. आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९७.९४ टक्के आहे.