करोना कालावधीत देशात लागू केलेल्या लॉकडाउननंतर आता परिस्थिती हळूहळू रुळावर येत आहे. असं असतानाच आता मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामधील जमीनीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईपासून जवळच असणाऱ्या अलिबागमधील जमीनींच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यातही बॉलिवूड, उद्योजक आणि गुंतवणूकदारांची ही मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारी जागी सध्या हॉट फेव्हरेट रियल इस्टेटमधील गुंतवणुकीसाठी पहिली पसंती ठरत आहे. असाच एक मोठा व्यवहार नुकताच या ठिकाणी पार पडला.

अवस येथे समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला, सहा एकरांवर पसरलेला एक आलिशान बंगल्याचा नुकताच सौदा झाला. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एका पारशी कुटुंबाने आपली संपत्ती रिटेल किंग आणि शेअर बाजारामधील गुंतवणुकीचे जाणकार असणारे अब्जाधीश राधाकृष्ण दमानी यांची पत्नी श्रीकांतदेवी यांना विकला आहे.

power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
South Central Mumbai
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांत धुसफूस, शिवसेनेकडून प्रचार फेऱ्यांना सुरुवात

डी-मार्टचे संस्थापक असणारे राधाकृष्ण दमानी यांनी मागील वर्षी दक्षिण मुंबईतील मलबार हिल्समध्ये एक हजार १ कोटींचा बंगला विकत घेतला होता. हे घर देशातील सर्वात महाग बंगला असल्याचं सांगण्यात आलं. राधाकृष्ण यांनी त्यांचे धाकटे बंदू गोपीकिशन दमानींसोबत हा बंगला विकत घेतला. आता दमानी कुटुंबाने अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक केलीय. राधाकृष्ण दरमानी यांनी २०१५ मध्ये १३८ कोटी रुपयांना रेडिसन ब्लू रिसॉर्ट अॅण्ड स्पा या हॉटेलची मालकी मिळवली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दमानी कुटुंबियांची ही अलिबागमधील दुसरी संपत्ती आहे. यापूर्वी दमानी कुटुंबाने जिराडमध्ये २० एकरांवर पसरलेलं एक मोठं फार्म हाऊसही विकत घेतल्याचं सांगितलं जातं. सध्या खरेदी केलेला आलिशान बंगला हा मांडवा जेट्टीपासून सहा किलोमीटरवर आहे. या बंगल्याच्या आवारामध्ये अनेक फळझाडं असल्याचं सांगण्यात येत आहे. हे घर तब्बल ८० कोटींना विकलं गेलं आहे.

…म्हणून आलिबागला मागणी
लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मुंबईमधील अती श्रीमंतांपैकी १५० कुटुंबे अलिबागमधील आपल्या फार्म हाऊसवर राहत होती. या कुटुंबियांपैकी अनेकजण सोशल नेटवर्किंगवर मोठमोठ्या आकारांच्या बागांमध्ये फिरताना, समुद्र किनाऱ्यावर चालताना आणि स्विमिंग पूलमधील फोटो पोस्ट करत होते. त्यामुळेच आता लॉकडाउननंतर येथे गुंतवणूक करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी समोरुन पुढे येत आहेत. अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणनेही दोन महिन्यापूर्वी आलिबागमधील मापगावमध्ये २२ कोटींचं घर खरेदी केलं. मुंबई ते मांडवा रो रो सेवा सुरु झाल्याने मांडव्यातील जमीनींचे भावही ५० टक्क्यांनी वाढलेत.

दमानींचा १००१ कोटींचा बंगला
मुंबईमधील मलबार हिल्स येथे दमानी कुटुंबाने विकत घेतलेला बंगला हा नारायण दाभोलकर मार्गावर आहे. या बंगल्याचं नाव ‘मधुकुंज’ असं आहे. हा बंगला दीड एकरांहून अधिक जमीनीवर आहे. बंगल्याचा एकूण बिल्डअप एरिया हा ६१ हजार ९१६ स्वेअर फूट इतका आहे. या बंगल्याच्या खरेदीसाठी दमानी कुटुंबाने ३० कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली होती.