विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरी : रोनाल्डोच्या पोर्तुगालचा पराभव

स्पेनने स्वीडनवर, तर क्रोएशियाने रशियावर १-० अशी मात करून विश्वचषकाची पात्रता मिळवली.

लिस्बन : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला पराभवाचा धक्का देत सर्बियाचा संघ पुढील वर्षी कतार येथे होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. रविवारी मध्यरात्री झालेल्या विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यात सर्बियाने २-१ असा विजय मिळवला.

सर्बियाप्रमाणेच स्पेन आणि क्रोएशिया या संघांनीही मुख्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. लिस्बन येथे झालेल्या सामन्यात रेनाटो सांचेझने दुसऱ्याच मिनिटाला गोल करत पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. मात्र, कर्णधार डूसान ताडिच (३३वे मिनिट) आणि अलेक्झांडर मित्रोव्हिच (९०वे मि.) यांनी केलेल्या गोलमुळे सर्बियाने सामन्यात २-१ अशी बाजी मारली. पात्रतेच्या ‘अ’ गटात सर्बियाने आठ सामन्यांत २० गुणांसह अव्वल स्थान मिळवले. गटातील उपविजेत्या पोर्तुगालला आता विश्वचषकाची मुख्य फेरी गाठण्यासाठी मार्चमध्ये होणाऱ्या चार संघांच्या बाद फेरीचा अडथळा पार करावा लागेल.

स्पेनने स्वीडनवर, तर क्रोएशियाने रशियावर १-० अशी मात करून विश्वचषकाची पात्रता मिळवली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ronaldo reflects on world cup qualifiers loss to serbia zws

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या