वेगवेगळ्या कारणांमुळे जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे तिथे समस्या निर्माण झाल्यात, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. याच कारणामुळे संघ हा सर्वव्यापी होऊन जागतिक कल्याणाबद्दल चर्चा करणार असल्याचं भागवत म्हणाले आहेत. हिंदू राष्ट्राच्या परम वैभवामुळे जगाचं कल्याण होईल, असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केलाय. करोना कालावधीमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी केलेली निःस्वार्थ सेवा म्हणजेच हिंदूत्व आहे, असं भागवत यांनी यावेळी हिंदूत्वाची व्याख्या सांगताना म्हटलं. अशा कामांमध्ये सर्वांच्या कल्याणाची भावना असते. हिंदूंची लोकसंख्या कमी झालेल्या ठिकाणी समस्या निर्माण झाल्याच्या भागवत यांच्या वक्तव्यावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय.

संपूर्ण जगाचा विचार करणारी संस्कृती

मोहन भागवत यांनी राजस्थानमध्ये उदयपुरमधील विद्या निकेतन सेक्टर ४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार यांच्या विचारांबद्दल भाष्य केलं. हेगडेवार यांनी हिंदू सामाजाला एकत्र आणल्यास भारताच्या सर्व समस्यांवर समाधान मिळवता येऊ शकतं असं म्हटल्याची आठवण भागवत यांनी करुन दिली. आपण सर्वजण भारतमातेची लेकरं आहोत. हिंदू हे सनातन संस्कृतीला मानणारे आहेत. सनातन संस्कृतीच्या विचारसणीमधील संस्कार हे संपूर्ण विश्वाचा विचार करण्याची शिकवण देतात. हिंदूंच्या विचारसरणीमध्ये शांती आणि सत्य या दोन गोष्टींचा समावेश आहे. आपण हिंदू नाहीत अशा प्रकारची एक मोहीम देश आणि समाजाला कमकूवत बनवण्याच्या उद्देशाने राबवली जात असल्याची टीका भागवत यांनी केलीय.

याच चिंतनातून झाला संघाचा जन्म

संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार यांनी भारतामधील विविधतेच्या तळाची एकतेचेचा भाव असल्याचं ओळखलं होतं, असंही भागवत यावेळी म्हणाले. अनेक पिढ्यांपासून या पुण्यवान प्रदेशामध्ये राहणाऱ्या पूर्वजांचे आपण वंशज असून सर्वचजण हिंदू आहोत. हाच हिंदुत्वाचा भाव आहे, असं सांगताना भागवत यांनी हेगडेवार यांच्या कार्याची माहितीही दिली. हेगडेवार यांननी आपल्या खासगी स्वार्थाची आहुती देत भारतासाठी काम करण्याचा मार्ग स्वत:च्या इच्छेने निवडला. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पुन्हा इतरांवर अवलंबून राहता कामा नये यासाठी काम करण्याची गरज हेगडेवार यांनी ओळखली. याच चिंतनामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला, असं भागवत म्हणाले.

संघ आज जगातील सर्वात मोठी संघटना…

संघ हा जागतिक बंधूभाव जपण्याच्या भावनेने काम करतो. संघासाठी संपूर्ण विश्व हे समान आहे. संघाला लोकप्रियतेची हाव नाहीय. श्रेयवाद, लोकप्रियता संघाला नकोय. ८० च्या दहशकापर्यंत हिंदू शब्द हा सार्वजनिकपणे बोलायलाही टाळलं जायचं. संघाने अशा परिस्थितीमध्ये प्रवाहाविरोधात जात काम केलं. सुरुवातीच्या काळामध्ये साधनांची कमतरता असतानाही संघ काम करत राहिला आणि आज संघ जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखला जातो, असं भागवत यांनी संघाचा प्रवास सांगताना म्हटलं.

एमआयएमआयएमने दिली प्रतिक्रिया

भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमचे असीम वकार यांनी मोहन भागवत यांनी पूर्ण विचार करुन अशी वक्तव्य करावीत असं म्हटलंय. ज्या ज्या ठिकाणी मुस्लीम अल्पसंख्यांक आहेत त्या ठिकाणी फार अत्याचार झाल्याचं पहायला मिळतं, मग ते गुजरात असो किंवा महाराष्ट्र. आपल्या शेजारी असणारे दोहा, कतार, दुबई असो किंवा ओमान असो कुठेच हिंदूंवर मुस्लीम अत्याचार करताना दिसत नाही. मात्र भारतात गुजरातबरोबरच अनेक ठिकाणी अत्याचाराची हद्द झालीय. त्यामुळे भागवत यांनी आपल्या वक्तव्याचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे.

सपा नेत्याने साधला निशाणा

तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते राकेश सिन्हा यांनी संघ प्रमुकांनी संघाची पारंपारिक विचारसणी लक्षात घेत हे वक्तव्य केल्याचं म्हटलं आहे. भागवत यांना धार्मिक उन्माद निर्माण करायचा आहे. त्यांना लोकांचं लक्ष मुख्य मुद्द्यांवरुन दुसरीकडे वळवायचं आहे. के. सी. त्यागी यांनी ज्या ठिकाणी आता मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे त्या लक्षद्वीप आणि काश्मीरमध्ये सध्या कोणतीही समस्या नसल्याचं म्हटलं आहे.

shrikant shinde latest marathi news
“आमचं काम बोलतं”, कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंची प्रचार मोहीम; शिळफाटा रस्त्यावर विविध विकास कामांचे होर्डींग
Prime Minister Narendra Modi slams congress over development
‘मोदींची गॅरंटी’ म्हणजे क्षणाक्षणाची मेहनत! वर्ध्यात नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा