विजयादशमी निमित्त दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा, करोनाची साथ नियंत्रणात आल्याने यंदा ऑनलाइनऐवजी थेट घेण्यात आला. मात्र, उपस्थितीच्या मर्यादेमुळे नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कऐवजी यंदाचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील अनेक गोष्टींवर भाष्य केले. आपल्या खास ठाकरे शैलीत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. 

साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था याविषयी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, असे निर्देश देणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं. या पत्राचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

dewendra fadanvis
आमचा प्रवक्ताही चर्चेत पाणी पाजेल…; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना…
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
bjp claim on thane lok sabha constituency
ठाण्यातून संजीव नाईक? मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम; मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

हा शिवरायांचा महाराष्ट्र

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी राज्यपालांना नम्रपणे सांगितल. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या माहाराष्ट्रात माता भगिणींचा मान सन्माक कसा करायचा ही शिकवण आम्हाला आहे. परंतु तरी देखील या गोष्टी घडत आहेत. तर आरोपी कोणीही असो, आम्ही क्षमा करणार नाही. साकीनाका प्रकरणाती आरोपीला फासावर लटकवल्याशिवाय आपण सोडणार नाही. महिलांवरी अत्याचार हे देशभर वाढत आहेत. आपली संस्कृती एक आहे. हिंदुत्व आपल एक आहे. तर विधानसभेचे अधिवेशन कशाला. आपण मोदीजींना सांगा आणि दोन दिवसांच संसदेच अधिवेशन घ्या, आठवडाभर घ्या. देशातील तमाम लोकप्रतिनिधी तेथे येतील आणि आपल्या राज्यातील परिस्थिती सांगतिल. घटना होणार नाहीत यासाठी देशात ठोस निर्णय घ्या.”

उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहील मळा फुलला आहे का?

“महाराष्ट्राकडे वेगळ्या नजरेने पाहिल्या जाते. महाराष्ट्रामध्ये काही घडलं तर गळा काढतात, लोकशाहीचा खून झाला म्हणून ओरडतात. महाराष्ट्रात जर लोकशाहीचा खून झाला म्हणून गळा काढत असाल तर उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहील मळा फुलला आहे का?” असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली.