‘कोण होईल मराठी करोडपती’च्या महामंच्यावर सिंधुताई सपकाळ

शेष म्हणजे यादिवशी सिंधुताई सपकाळ यांचा वाढदिवस देखील असतो.

कोण होईल मराठी करोडपतीचा हा विशेष भाग १४ नोव्हेंबर म्हणेज बालदिनच्या दिवशी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे

संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्याबद्दल आदर आहे आणि ज्या “अनाथांची माई” म्हणून ओळखल्या जातात अश्या महाराष्ट्राच्या लाडक्या सिंधुताई सपकाळ नुकत्याच कोण होईल मराठी करोडपतीच्या महामंच्यावर आल्या. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तींमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या आहेत. कोण होईल मराठी करोडपतीचा हा विशेष भाग १४ नोव्हेंबर म्हणेज बालदिनच्या दिवशी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे यादिवशी सिंधुताई सपकाळ यांचा वाढदिवस देखील असतो.

screen-shot-2016-11-08-at-5

कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर सगळ्यांनाच सिंधुताईंना बघून आनंद झाला. यावेळेस त्यांनी अनेक अनुभव, जुन्या आठवणी प्रेक्षकांसमोर मांडले तसेच अनेक मोलाचे सल्लेदेखील दिले. “स्वत:च्या सुखात इतरांचे दु:ख विसरू नका” असा मोलाचा सल्ला सिंधुताईनी उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच दिला. तुम्हाला हा भाग कोण होईल मराठी करोडपती शोमध्ये १४ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहता येईल.

दरम्यान, आधीच्या भागात महाराष्ट्राच्या दोन लाडक्या अभिनेत्री रिया बापट आणि सई ताम्हणकर यांनी हजेरी लावली होती. या विशेष भागामध्ये सई आणि प्रिया यांनी या कार्यक्रमामध्ये आपल्या लाडक्या सहकलाकारासोबत बरीच धम्माल मस्ती केली आणि जुन्या आठवणी देखील सांगितल्या. या विशेष भागामध्ये दोघींनी तब्बल ३ लाख २० इतकी धनराशी गुंज नामक संस्थेला मदत म्हणून दिली. त्याआधी या शोमध्ये देखील दिवाळी दणक्यात सेलिब्रेट करण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्राचे लाडके दांपत्य ज्याने नेहेमीच गरजू लोकांना मदतीचा हात दिला, त्यांच्या कठीण प्रसंगी खंबीर पणे उभे राहिले आणि अर्थात महाराष्ट्राच लाडक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे महेश मांजरेकर आणि त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर हे दिवाळी निमित्त कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर आले होते. तसेच, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पहिल्यांदा तिच्या भावासोबत म्हणजेच संदेश कुलकर्णीसोबत कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर भाऊबीज खास या भागासाठी आली होती.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sindhutai sapkal will soon seen in kon hoeel marathi crorepati quiz show

Next Story
चित्रपटांमध्ये आता बिनधास्त दाखवता येणार ‘बोल्ड सीन’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी