केंद्रीय ग्रामविकास खात्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र, ११ हजार ५०० गावात काम पूर्ण
नागपूर : केंद्राच्या स्वामित्व योजनेत ड्रोनद्वारे गावांचे सर्वेक्षण करण्याच्या कामात महाराष्ट्राने बजावलेल्या उत्तम कामगिरीची योग्य दखल घेत केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र (३ फेब्रुवारी २२) पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मालकीच्या मालमत्ताचे मिळकत प्रमाणपत्र (प्रॉपर्टी कार्ड) देण्यासाठी केंद्र सरकारने स्वामित्व योजना सुरू केली आहे. अभिलेख तयार करण्यासाठी प्रथम ड्रोनद्वारे गावातील मालमत्ताचे सर्वेक्षण केले जाते व त्यानंतर भूमिअभिलेख विभागाच्या माध्यमातून माहिती गोळा करून मिळकत प्रत्रिका तयार केली जाते. राज्याचा भूमिअभिलेख विभागाद्वारे केंद्राच्या भारतीय सर्वेक्षण विभागाच्या सहकार्याने सध्या या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. देशभरात आतापर्यंत १ लाख गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील ११ हजार ५०० गावांचा समावेश आहे. या गावातील नागरिकांना आता मिळकत प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही सध्या हे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, अतिशय कमी मनुष्यबळाच्या आधारावर भूमिअभिलेख विभागाने या कामाला गती दिली आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक एन.के. सुधांशू अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांचे नियोजन यासाठी कारणीभूत ठरले. या विभागात अनेक पदे रिक्त आहेत. पदोन्नतीचाही मुद्दा प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर विभागाने केलेल्या कामाची दखल केंद्र शासनाने घेतल्याने प्रशासनाची मान उंचावली आहे.
दरम्यान, ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रात ड्रोन सर्वेक्षणानंतर होणारी प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ३० जानेवारीपर्यंत ड्रोन सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्राप्त ८५६३ पैकी ३९०२ मानचित्रांची माहिती संकलित करण्यात आली, याकडे लक्ष वेधले आहे.
इतर राज्यांसाठी आदर्श
गिरीराज सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात राज्यातील कामगिरीचे कौतुक केले आहे. या योजनेत महाराष्ट्राची कामगिरी सुरुवातीपासूनच उत्तम आहे. करोना महामारीच्या काळातही प्रतिदिन ३-४ गावांचे सर्वेक्षण करून या कामाला गती देऊन महाराष्ट्राने देशातील इतर राज्याच्यापुढे आदर्श निर्माण केला, असे गिरीराज यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.

Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Women officers and employees are fully responsible for voting stations where number of women voters is more than men
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…
onion, farmers
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या केंद्र सरकारचा निर्णय